Tarun Bharat

रवीना टंडनलाही ‘हंबीररावां’चा अभिमान

गेल्या काही दिवसांपासून ‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर बाहुबली फेम प्रभासने ट्वीट केले होते. तर आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही यावर एक पोस्ट शेअर केली. यात सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे रवीनाने ही पोस्ट मराठीत केल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. रवीनाने सरसेनापती हंबीररावचा टीझर ट्वीट करत शेअर केला. हा टीझर शेअर करत ‘प्रवीण तरडे आणि टीम सरसेनापती हंबीरराव या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा’, असे कॅप्शन रवीनाने दिले आहे. रवीनाने मराठीत ट्वीट करत मराठी चित्रपटसृष्टीला दिलेला पाठिंबा पाहत नेटकऱयांनी तिची स्तुती केली आहे. तरडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशा चारही जबाबदाऱया पार पाडल्या आहेत. ‘मराठीत कधी दिसलं नाही असं काहीतरी, व्हीएफएक्स, भव्यदिव्य सेटने परिपूर्ण असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार’, असं तरडे म्हणाले होते.

तर खरचं या चित्रपटाच्या भव्यतेची झलक या टीझरमध्ये पहायला मिळते. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते. आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची प्रवीण तरडे यांनी घोषणा केली तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. याआधी प्रवीण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं होतं.

Related Stories

अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही विरोधात भाजप आमदाराकडून तक्रार

Tousif Mujawar

डॉ. अजितकुमार देवला लागणार झटका…

Patil_p

देसी गर्लचे निकसोबत लक्ष्मीपूजन

Patil_p

राणी अहिल्याबाईंच्या भूमिकेत प्रियंका चोप्रा?

Amit Kulkarni

आदर्श शिंदेच्या आवाजात घुमणार ‘हे गणराया’

Patil_p

अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

Tousif Mujawar