Tarun Bharat

रशिद, रबाडा, लिव्हिंगस्टोन ‘एमआय केपटाऊन’ संघात

Advertisements

केपटाऊन / वृत्तसंस्था

उद्घाटनाच्या क्रिकेट दक्षिण आफ्रिका टी-20 लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स प्रँचायझी एमआय केपटाऊन नावाने संघ उतरवणार असून त्यात अफगाणचा स्टार फिरकीपटू रशिद खान, दक्षिण आफ्रिकेचा स्पीडस्टार कॅगिसो रबाडा व आक्रमक इंग्लिश फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन यांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा डेव्हाल्ड ब्रेविस व इंग्लिश अष्टपैलू सॅम करण यांनाही एमआय केपटाऊन संघात थेट एन्ट्री देण्यात आली. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत रशिद गुजरात टायटन्सकडून, रबाडा व लिव्हिंगस्टोन पंजाबकडून खेळतात. करण मागील आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळला. एमआयने आतापर्यंत 3 विदेशी, 1 दक्षिण आफ्रिकन व 1 नवोदित द. आफ्रिकन खेळाडूला करारबद्ध केले आहे.

Related Stories

युरो 2020 सर्वोत्तम संघात इटलीचे पाच खेळाडू

Patil_p

टोकियो ऑलिंपिकमधून बेरेटेनीची माघार

Patil_p

प्रशिक्षक रवि शास्त्री कोरोनाबाधित

Patil_p

महान अष्टपैलू इयान बोथम ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’चे मानकरी

Patil_p

सिमोन बाईल्सचे शानदार पुनरागमन

Patil_p

विंडीज मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा

Patil_p
error: Content is protected !!