Tarun Bharat

रशियाकडून क्लस्टर बॉम्बचा वापर

Advertisements

जी-7 देशांचा आरोप : जबाबदार व्यक्तींवर चालावा युद्धगुन्हय़ाचा खटला

‘युद्धात सर्व काही क्षम्य’ असल्याचे म्हटले जाते, परंतु तरीही युद्धाचे नियम असतात आणि त्यांचे उल्लंघन केल्यास त्याला युद्धगुन्हा म्हटले जाते. रशियाने युक्रेनमध्ये क्लस्टर बॉम्ब आणि अन्य प्रतिबंधित शस्त्रास्त्रांचा वापर चालविला आहे. यामुळे याकरता जबाबदार रशियातील व्यक्तींवर युद्धगुन्हय़ाचा खटला चालविण्याची मागणी जी-7 देशांनी केली आहे.

युक्रेनच्या शहरांमधील नागरी लोकसंख्येच्या विरोधात रशियाकडून सातत्याने होणाऱया हल्ल्यांमुळे विध्वंसावरून अत्यंत चिंतेत आहोत. युक्रेनच्या लोकांवर रशियाच्या सैन्य हल्ल्यांसाठी जबाबदार लोकांना त्यांच्या गुन्हय़ांसाठी जबाबदार ठरविले जावे अशी मागणी जी-7 देशांच्या विदेशमंत्र्यांनी केली आहे.

आंतररराष्ट्रीय मानवी कायद्याद्वारे अंदाधुंद हल्ले निषिद्ध आहेत. युक्रेनच्या लोकांच्या विरोधात शस्त्रास्त्रांचा अंदाधुंद वापर युद्धगुन्हा असून याकरता जबाबदार लोकांना शिक्षा मिळवून देऊ. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे प्रॉसिक्युटर तपास करत असुन यात युद्धगुन्हा किंवा नरसंहारासाठी जबाबदार वरिष्ठ अधिकाऱयांच्या विरोधात चौकशी केली जाणार आहे. या अधिकाऱयांच्या निर्णयांमुळे युक्रेनमध्ये मोठा विध्वंस घडून आला असून अनेक जण मारले गेले असल्याचे जी-7 देशांच्या मंत्र्यांनी म्हटले आहे.

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 85 लाखांचा टप्पा

datta jadhav

पेरूमध्ये बाधितांची संख्या 12.83 लाखांवर

datta jadhav

8 हजार जम्बो जेट्सची आवश्यकता

Patil_p

जगप्रसिद्ध गायकाचा संशयास्पद मृत्यू

datta jadhav

अध्यक्षीय कार्यालयात पोहोचले होते रशियाचे सैनिक

Patil_p

नेपाळमध्ये संसद बरखास्त; एप्रिलमध्ये मध्यावधी निवडणुका

datta jadhav
error: Content is protected !!