Tarun Bharat

रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणार इंधन

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिणाम थेट कच्च्या तेलाच्या दरावर झाला आहे. कमोडिटी बाजारात कच्च्या तेलाचे दर मोठय़ा प्रमाणात वाढल्याने भारतासाठी तेलाची आयात खर्चिक होणार होती. त्यामुळे भारतात होणारी संभाव्य दरवाढ टाळण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारत आता रशियाकडून सवलतीच्या दरात इंधन खरेदी करणार आहे.

युक्रेनशी युद्ध छेडल्याने युरोप आणि अमेरिकेन देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. रशियावरील हे निर्बंध भारताच्या पथ्यावर पडणार आहेत. रशियाने भारताला कच्च्या तेलाच्या विक्रीचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव भारताने मान्य केला आहे. ‘इंडियन ऑइल’ने सोमवारी ‘व्हायोटेल’समवेत रशियाशी तीस लाख बॅरल कच्च्या तेलाच्या खरेदीचा करार केला. हे तेल मे महिन्यात देशात दाखल होणार आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करताना व्यवहार रुबल रुपयामध्ये करण्याची दाट शक्यता आहे. रुबल डॉलरच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणात खाली घसरला आहे. त्यामुळे भारताला ह्या तेल खरेदीतून मोठा फायदा होणार आहे. परदेशी चलन वाचणार असून, 27 ते 30 टक्के सवलतीच्या दरात तेल खरेदी करता येणार आहे.

Related Stories

भीषण बस अपघातात उत्तर प्रदेशात 8 ठार

Patil_p

‘शाहीन बाग’मागे राजकीय कट : मोदी

Patil_p

टूलकिटद्वारे काँग्रेसकडून भारताची बदनामी!

Patil_p

एम. शशिधर रेड्डी यांचा काँग्रेसला रामराम

Patil_p

बिहार निवडणुकीसाठी रालोआचे जागावाटप जाहीर

Patil_p

ओडिशा सरकारने 30 एप्रिल पर्यंत वाढवला लॉक डाऊनचा कालावधी

prashant_c
error: Content is protected !!