Tarun Bharat

रशियाचा आंद्रे रूबलेव्ह अजिंक्य

Advertisements

वृत्तसंस्था/ व्हिएन्ना

रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील व्हिएन्ना खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धैत रशियाच्या आंद्रे रूबलेव्हने सोनेगोचा पराभव करत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. 2020 च्या टेनिस हंगामात रूबलेव्हचे एटीपी टूरवरील हे पाचवे विजेतेपद आहे. लंडनमध्ये 15 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया एटीपी टूरवरील अंतिम स्पर्धेत रूबलेव्हने स्थान मिळविले आहे.

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात रूबलेव्हने इटलीच्या सोनेगोचा तासभराच्या कालावधीत 6-4, 6-4 असा पराभव केला. व्हिएन्ना स्पर्धेमध्ये 23 वर्षीय रूबलेव्हने एकदाही आपली सर्व्हिस न गमविताना विजेतेपद मिळविले आहे. 2020 च्या टेनिस हंगामात रूबलेव्हने 39 सामने जिंकले असून तो एटीपी मानांकनात आठव्या स्थानावर आहे.

Related Stories

नव्या आयपीएल संघांसाठी 17 ऑक्टोबरला लिलाव

Patil_p

डेव्हिस चषक ः भारताचा पराभव

Patil_p

यंदाचा टी-20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून युएईत, 14 नोव्हेंबरला फायनल

Amit Kulkarni

होय, मी चीट केले! आनंदला पराभूत करणाऱया अब्जाधीशाची कबुली!

Patil_p

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला 7 पदके

Patil_p

भारतीय नेमबाजांचे झाग्रेबकडे प्रयाण

Patil_p
error: Content is protected !!