Tarun Bharat

रशियाची कॅसात्किना विजेती

वृत्तसंस्था/सेंट पीटर्सबर्ग

रविवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील सेंट पीटर्सबर्ग महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या दारिया कॅसात्किनाने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. 2021 च्या टेनिस हंगामातील कॅसात्किनाचे डब्ल्यूटीए टूरवरील हे दुसरे विजेतेपद आहे.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रशियाच्या कॅसात्किनाने आपल्याच देशाच्या गॅस्पारियनचा 6-3, 2-1 असा पराभव केला. दुखापतीमुळे गॅस्पारियनने दुसरा सेट अर्धवट सोडून स्पर्धेतून माघार घेतली. 23 वर्षीय कॅसात्किनाने गेल्या महिन्यात मेलबर्नमधील झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

Related Stories

भारतीय संघाने निर्भयपणे खेळण्याची गरज : स्टिमॅक

Amit Kulkarni

कसोटी क्रमवारीत केन विल्यम्सनची अग्रस्थानावर झेप

Patil_p

कोरोनाबाधित मनदीप सिंग रूग्णालयात दाखल

Patil_p

सिंधू, प्रणितचे आव्हान संपुष्टात

Patil_p

पृथ्वी शॉचे नाबाद द्विशतक

Patil_p

पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाची आघाडी

Patil_p