Tarun Bharat

रशियाची कोरोना लस 15 ऑगस्टपर्यंत येणार

दुसऱया टप्प्यातील चाचणी अंतिम टप्प्यात

मॉस्को / वृत्तसंस्था

जगभरात कोरोनावरील लस तयार करण्यासाठी जवळपास 23 प्रकल्पांवर काम सुरू असून काही चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. तथापि, रशियाकडून या लसीबद्दल सकारात्मक वृत्त धडकले असून येत्या पंधरवडय़ात रशियाची लस बाजारात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रशियाची ही लस मॉस्कोमधील गमलेया इन्स्टिटय़ूटने विकसित केली आहे.

जगात कोरोनावर अनेक ठिकाणी संशोधन आणि लसीवर काम चालू आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश सुरू आहे. लाखो लोकांना याचा संसर्ग झाला असून साडेसहा लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. मात्र, अजूनही प्रभावी लस काढण्यात संशोधकांना यश आलेले नाही. मात्र, अमेरिका, ब्रिटन आणि रशिया या देशांनी संशोधनाच्या पातळीवर आघाडी घेतलेली दिसते. रशिया हा देश लस वापरण्यास मान्यता देऊ शकेल. 10 ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी लसीला मंजुरी देण्याच्यादृष्टीने रशियन सरकार आणि शास्त्रज्ञांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मॉस्कोस्थित गमलेया इन्स्टिटय़ूटने बनवलेली लस सार्वजनिक वापरासाठी मंजूर केली जाणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात ती केवळ आरोग्य कर्मचाऱयांना (हेल्थकेअर) दिली जाणार आहे. त्यातही थेट कोरोना बाधितांची सेवा करणाऱया आरोग्य कर्मचाऱयांना पहिल्यांदा ती दिली जाणार असल्याची माहिती रशियन अधिकाऱयांनी दिली.

रशियन लसीचा दुसरा टप्पा सध्या प्रगतीपथावर आहे. 3 ऑगस्टपर्यंत तो पूर्ण होईल, अशी अपेक्षा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर तिसऱया टप्प्यातील चाचणी सुरू होईल. इतर रोगांशी लढण्यासाठी आधीच तयार केलेल्या लसीची ही सुधारित आवृत्ती असल्यामुळे ही लस अतिशय कमी वेळात पूर्ण झाल्याची स्पष्टोक्ती शास्त्रज्ञांनी दिली आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या मते, रशियन सैनिकांनी या लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. या लसी बनविण्याच्या प्रकल्पाचे संचालक अलेक्झांडर जिन्सबर्ग यांनीही स्वतः लस घेतल्याचा दावाही केला जात आहे.

आतापर्यंत लस चाचणीसंबंधी कोणतीही माहिती रशियाने अधिकृतपणे सामायिक केली नव्हती. त्यामुळे ही लस किती प्रभावी असेल हे या क्षणी सांगणे कठीण आहे. रशियाची लस बाजारात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी राजकीय दबाव असल्याचीही चर्चा आहे. या माध्यमातून आपली वैज्ञानिक शक्ती जगासमोर ठेवता येईल, असा प्रयत्नही रशियाने चालवल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

13 वर्षीय मुलीला बलात्कारामुळे मातृत्व

Patil_p

अरुणाचल प्रदेशजवळ चीनची धरणनिर्मिती

Patil_p

बेकायदेशीर ताबा सोडा!

Patil_p

जगभरातील बाधितांची संख्या 12 कोटींवर

datta jadhav

क्वाडला पुढे नेणारे इंजिन आहे भारत

Patil_p

47 वर्षांनंतर ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर!

Patil_p
error: Content is protected !!