Tarun Bharat

रशियाची ‘ती’ लस ऑगस्ट मध्यापर्यंत होणार उपलब्ध

Advertisements

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियाने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा सेचेनोव्ह विद्यापीठाने केला होता. त्यानंतर आता ही लस 12 ते 14 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती गॅमलेई सेंटरचे प्रमुख अलेक्झांडर गिंटझबर्ग यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. 

रशियाने शोधलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी 38 स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या पार पडली. रशियन सैन्याने देखील सरकारी गेमलेई राष्ट्रीय संशोधन केंद्रात दोन महिन्यांत या लसीच्या समांतर चाचण्या पूर्ण केल्या. गेमलई संशोधन केंद्राच्या प्रमुखांच्या मते मानवी चाचणीत ही लस पूर्णपणे सुरक्षित ठरली आहे. ही लस जेव्हा ऑगस्टमध्ये उपलब्ध केली जाईल, तेव्हा ती तिसऱ्या टप्प्यातील चाचणीप्रमाणे असेल.

तिसऱ्या टप्प्यात या लसीची चाचणी होणे आवश्यक आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार कोणत्याही लसीची अथवा औषधाचे प्रमाणात उत्पादन होण्यापूर्वी तीन टप्प्यांत चाचणी होणे आवश्यक आहे.

Related Stories

एनडीआरएफच्या पथकाकडून पंचगंगेच्या पाणी पातळीचा आढावा

Rahul Gadkar

भागिरथी होम मिनिस्टर स्पर्धेत प्रणिता फराकटे प्रथम

Abhijeet Khandekar

वयाच्या 100 वर्षी अनोख्या इच्छेची पूर्तता

Patil_p

मेड इन इंडिया कार्बाइन्सची खरेदी करणार भारतीय सैन्य

Omkar B

धक्कादायक! कैद्याने मलाशयात लपवले 4 मोबाईल

datta jadhav

आंतरराष्ट्रीय शूटर चंद्रो तोमर यांचे निधन

Tousif Mujawar
error: Content is protected !!