Tarun Bharat

रशियाची पहिली लस सर्वसामान्यांसाठी खुली

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

कोरोनावर प्रभावी ठरलेली रशियाची जगातील पहिली लस आता सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात घोषणा केली आहे. 

‘स्पुटनिक V’ असे रशियाच्या या कोरोना प्रतिबंधक लसीचे नाव आहे. रशियाच्या गमालिया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड यांनी एकत्रितपणे ही लस तयार केली आहे. या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे रशियाने म्हटले आहे. तसेच लसीची पहिली बॅच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स समोर आले नाहीत. त्यामुळे रशियात लसीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. 

लस तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्ट फंडाचे सीईओ किरिल दिमित्रीज यांनी सांगितले की, या लसीची वैद्यकीय चाचणी भारतासह सौदी अरेबिया, फिलीपीन्स आणि ब्राझील येथेही या महिन्यात सुरू होईल.

Related Stories

सर्वसमावेशक सरकार स्थापन करणार

Patil_p

जगभरातील बळींचा आकडा 50 हाजारांवर

Patil_p

रशियाचे संरक्षणमंत्री शोईगू गायब?

Patil_p

काबूलमधील शाळेत स्फोट, 19 विद्यार्थी ठार

Patil_p

रशियन न्यूक्लियर बॉम्बरचे उड्डाण

Patil_p

ट्विटरच्या 40 कोटी ग्राहकांच्या माहितीची चोरी

Patil_p