Tarun Bharat

रशियाच्या तेलासंबंधी नियम समान हवेत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

रशियाकडून युरोपियन देशांसह भारतही कच्च्या इंधन तेलाची आयात करीत आहे. या आयातीसंबंधीचे नियम समान असावेत, अशी आग्रही भूमिका भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी मांडली आहे. युरोपियन महासंघासाठी वेगळे नियम आणि भारतासाठी दुसरेच नियम असा पंक्तीप्रपंच चालणार नाही. भारत तो मानणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी मंगळवारी केली.

सध्या जर्मनीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री ऍनालेना बेअरबॉक या भारताच्या दौऱयावर आहेत. त्यांच्याशी जयशंकर यांनी द्विपक्षीय संबंध आणि जागतिक परिस्थितीच्या संबंधी सविस्तर चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत भाग घेतला. रशियाने युक्रेनशी सुरु केलेल्या बेकायदेशीर युद्धामुळे भारतासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे विधान बेअरबॉक यांनी केले. जयशंकर यांनी त्याला उत्तर देताना तेलाच्या आयातीचा प्रश्न उपस्थित केला. भारताने रशियाकडून जितके तेल केल्या एक वर्षात आयात केले आहे, त्याच्यापेक्षा सहा पट अधिक तेल युरोपियन महासंघाने आयात केले आहे. रशियाच्या तेलासंबंधी नियम स्पष्ट आणि समान असावेत. दुजाभाव केला जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. रशिया युरोपियन महासंघाला कोळसाही निर्यात करतो. त्या निर्यातीचे प्रमाणही भारताच्या दुप्पट आहे. यासंबंधातील भारताची बाजू जर्मनी आणि युरोपियन महासंघाने समजून घ्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

अफगाणिस्तानवरही चर्चा

दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्ताच्या परिस्थितीवरही चर्चा केली. चीनसंबंधीही बोलणी झाल्याची माहिती देण्यात आली. भारत आणि जर्मनी हे दोन्ही देश लोकशाही आणि मानवी मूल्यांना मानणारे आहेत. या दोन्ही देशांची भागीदारी ही तत्वाधारित असल्याने तिची चीनशी असणाऱया संबंधांशी तुलना होऊ शकत नाही. भारत हा जर्मनीचा विश्वासू साथीदार आहे, अशी भलावण बेअरबॉक यांनी केले.

Related Stories

पदवी परीक्षांसंबंधीची सुनावणी लांबणीवर

Patil_p

दिल्ली : कोरोनाग्रस्तांचा आकडा 5.78 लाख पार

Tousif Mujawar

‘इन्फोसिस’ सीईओंना अर्थ मंत्रालयाचे समन्स

Patil_p

उत्तराखंड निवडणुकीसाठी ‘आप’चे घोषणापत्र

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का ; प्रणव मुखर्जींच्या मुलाचा तृणमूलमध्ये प्रवेश

Archana Banage

‘मोरेटोरियम’ची मुदत वाढणार?

Patil_p