Tarun Bharat

रशियाच्या पाचव्या सैन्याधिकाऱयाचा मृत्यू

युक्रेन युद्धात रशियाला आणखीन एक झटका

रशिया-युक्रेन युद्धाच्या 31 व्या दिवशी रशियाच्या सैन्याच्या आणखीन एका अधिकाऱयाचा मृत्यू झाला आहे. युद्धात जीव गमावणारा हा पाचवा सैन्याधिकारी आहे. याची पुष्टी रशियानेच दिली आहे. ब्लॅक सी फ्लीटच्या 810 व्या सेपरेट गार्ड्स मरीन ब्रिगेडचे कर्नल अलेक्सी शारोव्ह यांना युक्रेनच्या एका स्नायपरने टिपले आहे. रशियाने या युद्धात स्वतःचे 7000 ते 15 हजारपर्यंत सैनिक गमाविले असल्याचा दावा नाटोने काही दिवसांपूर्वी केला होता.

मेजर जनरल ओलेग मित्येव्ह यांना युक्रेनच्या सैन्याने यापूर्वी ठार केले होते. तर रशियाच्या सैन्याचे मेजर जनरल विताली गेरासिमोव्ह, एंड्री सुखोवेत्स्की आणि रशियन फोर्स मुख्यालयाचे उपप्रमुख मेजर एंड्री बर्लाकोव्ह यांचाही युद्धादरम्यान मृत्यू झाला आहे. बर्लाकोव्ह हे रेजिमेंट चीफ ऑफ स्टाफ देखील होते. त्यांच्याकडे युद्धसंबंधी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱया देखील होत्या.

Related Stories

न्यूझीलंडच्या पंतप्रधान आर्डर्न राजीनाम्याच्या पवित्र्यात

Amit Kulkarni

महामारीमुळे 1 अब्ज लोक दारिद्रय़ाच्या वाटेवर

Patil_p

जगातील सर्वात भीतीदायक ठिकाण

Patil_p

2024 मध्ये उड्डाण करणार नेपच्यून

Patil_p

ट्रम्प-बायडन अटीतटीचा संग्राम

Omkar B

दिग्गज सीईओंना मागे टाकत वेतन कमाईत महिला सीईओ अव्वल

Patil_p