ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
पूर्व युरोप जवळील काळ्या समुद्रावर रशियाच्या सुखोई-27 या लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या आण्विक बी-52 विमानाला अत्यंत धोकादायक पद्धतीने घेरले.
रशिया आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाटो सदस्य असलेल्या अमेरिकेने ब्रिटनमध्ये आण्विक बी-52 विमाने तैनात केली आहेत. अमेरिकेच्या या बॉम्बर विमानाने ब्रिटनमधून उड्डाण केले होते. हे बॉम्बर विमान काळ्या सुमद्रात गस्त घालत होते. त्याचवेळी रशियाच्या सुखोई-27 या लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या बॉम्बर विमानाला घेरले. रशियन विमानांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
दरम्यान, रशियाने नाटोच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी क्रिमियात मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ही विमाने काळ्या समुद्रावरही नजर ठेवून आहेत.