Tarun Bharat

रशियातील फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा

वृत्तसंस्था/ मॉस्को

कोरोना महामारीचा प्रसार रशियामध्ये वेगात होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रशियाचा वयस्कर फुटबॉलपटू पेरूचा जेफरसन फेरफेन याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. प्रिमियर लीग फुटबॉल हंगामाला पुन्हा प्रारंभ करण्यासाठी केवळ पाच आठवडे बाकी असताना रशियात कोरोनाची बाधा झालेला फेरफेन हा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.

फेरफेन हा लोकोमोटीव मॉस्को क्लबचे प्रतिनिधीत्व करीत आहे. 35 वर्षीय फेरफेन याचे वास्तव्य सध्या मॉस्कोमध्ये असून त्याच्यावर वैद्यकीय इलाज तातडीने सुरू करण्यात आले आहे. रशियन प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धा 17 मार्चपासून तहकूब करण्यात आली होती पण आता ती 21 जूनपासून पुन्हा बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना खेळविली जाणार आहे.

Related Stories

झंझावात धोनीचा, विजय मात्र केकेआरचा!

Patil_p

अश्विन, झाम्पा, रिचर्डसनची आयपीएलमधून माघार

Patil_p

प्लिसकोव्हाचे बेजिन नवे प्रशिक्षक

Patil_p

पुनित बिस्तचा सर्वाधिक 17 षटकारांचा विक्रम

Patil_p

बूम बूम गोलंदाजीसाठी बुमराह सज्ज

Patil_p

अल्कारेझ-रुड, स्वायटेक-जेबॉर अंतिम फेरीत

Patil_p