Tarun Bharat

रशियात ‘एविफेविर’च्या वापराला परवानगी

Advertisements

चार दिवसात कोरोना रुग्ण बरा होत असल्याचा दावा

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या एविफेविर (Avifavir) या औषधाच्या वापरला रशियाने परवानगी दिली आहे. अल्पावधीतच या औषधाच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, या औषधांची मागणी आणि परिणामकारकता लक्षात घेता रशियाने ही परवानगी दिली आहे. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे (आरडीआयएफ) सार्वभौमत्व अधिकार असणाऱ्या मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. 

जगभरात कोरोनावर प्रतिबंधात्मक लस आणि औषधांच्या चाचण्या सुरू आहेत. त्यातच रशियात निर्मिती करण्यात आलेल्या एविफेविर या औषधाची चाचणी घेण्यात आली. या औषधाच्या चाचण्यांदरम्यान बुहतांश रुग्ण हे चार दिवसात पूर्णपणे बरे झाल्याचा दावा आरडीआयएफने मागील आठवड्यात केला होता. त्यानंतर रशियातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता हे औषध देशाच्या वेगवेगळ्या भागांमधील काही रुग्णालयांमध्ये आणि क्लिनीकमध्ये उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

एविफेविर हे औषध बनवण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांची मदत घेण्यात आली असून, त्यामध्ये केमरार या कंपनीचा ५० टक्के वाटा आहे. केमरारच्या माध्यमातून महिन्याला ६० हजार रुग्णांवर उपचार करता येईल एवढ्या प्रमाणात औषध बनवण्याची योजना असल्याचे आरडीआयएफकडून सांगण्यात आले.

फॅव्हीपीरावीर या रशियातील ताप, सर्दीवर असलेल्या  औषधाची परिणामकारकता वाढून एविफेविर हे औषध तयार करण्यात आले आहे.

Related Stories

कोल्हापूरच्या माहेश्वरी यांनी ऑस्ट्रेलियात फडकवला तिरंगा

Abhijeet Shinde

शहरातील कॉलेजकट्टे फुलले

Abhijeet Shinde

नितीशकुमार यांचे राज्यपालांकडे त्यागपत्र

Omkar B

‘या’ कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला रद्द

Rohan_P

हरियाणामध्ये गेल्या 24 तासात 694 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 26,858

Rohan_P

अमेरिकेत बाधितांनी ओलांडला 3 कोटींचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!