Tarun Bharat

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 7 लाखांवर

Advertisements

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियात कोरोनाबाधितांची संख्या सात लाखांवर गेली आहे. मागील 24 तासात रशियात कोरोनाचे 6509 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 176 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियात आतापर्यंत 7 लाख 13 हजार 936 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 11 हजार 017 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

 7.13 लाख कोरोनाबाधितांपैकी 4 लाख 89 हजार 068 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 13 हजार 851 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2300 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना संक्रमणाच्या बाबतीत रशिया जगात चौथ्या स्थानावर आहे. रशियात आतापर्यंत 2 कोटी 23 लाख 88 हजार 195 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, या आकडेवारीच्या विश्वासार्हतेविषयी शंका व्यक्त होत आहे. 

Related Stories

वाढीव कार्यकाळ नको; NSE चे CEO विक्रम लिमये

Abhijeet Shinde

सर्वाधिक लसीकरण तरीही दुप्पट रुग्ण

Patil_p

वसूल केलेले ३.१८ कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले : ईडी

Abhijeet Shinde

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन अतिरेक्यांचा खात्मा

Abhijeet Shinde

उत्तर कोरिया : टीव्हीवर परदेशातील कार्यक्रम पाहिल्यास क्रूर शिक्षा

datta jadhav

जीएसटी रिटर्न भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

datta jadhav
error: Content is protected !!