Tarun Bharat

रशियात कोरोनाबाधितांनी ओलांडला 15 लाखांचा टप्पा

Advertisements

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियात कोरोनाबाधितांच्या संख्येने 15 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. रशियात आतापर्यंत 15 लाख 81 हजार 693 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 11 लाख 86 हजार 041 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

रशियात गुरुवारी 17 हजार 717 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 366 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रशियात 3 लाख 68 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2 हजार 300 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 27 हजार 301 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत रशियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. रशियात आतापर्यंत 5 कोटी 92 लाख 84 हजार 119 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या, भारत दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 92 लाख 12 हजार 767 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतात 80 लाख 88 हजार 851 तर ब्राझीलमध्ये ही संख्या 54 लाख 96 हजार 402 एवढी आहे. 

Related Stories

रशियातील व्हिक्टरी परेडमध्ये फडकला तिरंगा

Patil_p

ऑस्ट्रेलियात भीषण पूर, लाखो लोकांचे स्थलांतर

Patil_p

अमेरिकेत परमाणु हल्ला करणाऱ्या विमानांची गस्त

datta jadhav

धार्मिक, राजकीय आयोजनांमुळे कोरोना संक्रमणाचा फैलाव

Amit Kulkarni

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांचा कॅपिटॉल इमारतीत धुडगूस; गोळीबारात एक महिलेचा मृत्यू

Rohan_P

लस : साठवणूक अन् वितरणही आव्हानात्मक ठरणार

Patil_p
error: Content is protected !!