Tarun Bharat

रशियात कोरोनामुळे दिवसात 1000 मृत्यू

प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने लोकांचा मृत्यू

मॉस्को / वृत्तसंस्था

रशियामध्ये शनिवारी कोरोना विषाणू संसर्गामुळे 1002 लोकांचा मृत्यू झाला. कोरोना महामारी पसरल्यानंतर इतक्मया मोठय़ा संख्येने लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नाही तर रशियामध्ये कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांची संख्या देखील सतत वाढत आहे. गेल्या 24 तासात 33 हजार 208 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. रशियामध्ये आतापर्यंत 2 लाख 22 हजार 315 लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तसेच 79 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. युरोपीय देशांपैकी रशियात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तसेच जगात रशिया पाचव्या क्रमांकावर आहे.

Related Stories

हास्याचा आरोग्याशी थेट संबंध

Amit Kulkarni

हे आहे इंटरनेटचे सामर्थ्य

Amit Kulkarni

धास्तवलेले जग

Amit Kulkarni

कोल्हापुरातील रामाचा पार सार्वजनिक व्यासपीठ, भरायच्या जंगी सभा

Archana Banage

मृतदेहासमवेत दीड वर्षे वास्तव्य

Patil_p

बेघर व्यक्तीचे अनोखे मांजर प्रेम

Patil_p