Tarun Bharat

रशियात प्रदर्शित होणार मराठी चित्रपट

 

ऑनलाईन टीम / मुंबई

संदिप खरात यांची निर्मिती असणाऱ्या ‘काळ’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरु आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. काळजाचा थरकाप उडविणारा हा चित्रपट येत्या २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही, तर रशियामध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. महत्वाचं म्हणजे रशियामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. रशियातील ३० शहरांमधील १०० चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसंच चौथ्या बॉलिवूड चित्रपट महोत्सवातदेखील ‘काळच्या’ प्रीमिअरचं आयोजन केलं जाणार आहे.

 

‘काळ’चा ट्रेलर पाहिल्यानंतर रशियातील कंपनीने आणि चित्रपट महोत्सव आयोजकांनी निर्माते आणि फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना रशियातील प्रदर्शनासाठी विनंती केली.‘काळ’चे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन डी. संदीप यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर तसेच नितिन प्रकाश वैद्य आणि डी संदीप यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

Related Stories

कंगनाच्या अडचणीत वाढ! पासपोर्ट नूतनीकरणास प्राधिकरणाचा नकार

Tousif Mujawar

‘वागले की दुनिया’ ‘बेस्ट शो ऑन इंडियन टेलिव्हिजन’

Patil_p

‘या’ बँकेत 100 ग्राहक झाले करोडपती…

Kalyani Amanagi

80 वर्षांच्या आजोबांची भूमिका साकारणं आव्हानात्मक : दिलीप प्रभावळकर

Patil_p

अजय देवगण यांच्याकडून ‘पॅनोरमा म्युझिक’चा श्रीगणेशा

Patil_p

खुशी चालूवर्षीच ठेवणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Patil_p