Tarun Bharat

रशियात बाधितांची संख्या 40 लाखांच्या उंबरठ्यावर

Advertisements

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 39 लाख 98 हजार 216 वर एवढी आहे. त्यामधील 34 लाख 93 हजार 886 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

वर्ल्डोमीटरनुसार, रशियात सोमवारी 15 हजार 916 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 407 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4 लाख 26 हजार 732 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2 हजार 300 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 77 हजार 598 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत रशियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. रशियात आतापर्यंत 10 कोटी 50 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या, भारत दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 77 लाख 629 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतात 1 कोटी 08 लाख 47 हजार 790 तर ब्राझीलमध्ये ही संख्या 95 लाख 50 हजार 301 एवढी आहे.

Related Stories

दगडात रोवलेली 700 वर्षे जुनी तलवार

Amit Kulkarni

भारतीय ‘मिशन मंगळ’नंतर चीनचे  ‘रोवर मिशन टू मार्स’ लॉन्च

Rohan_P

ड्रग्ज तस्करांचे संशयास्पद विमान क्विंटाना रू प्रांतात उतरले

datta jadhav

कॉन्कर्ड युग परतणार

Patil_p

हैदराबाद-दुबई विमानतळादरम्यान करार

Patil_p

नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात भारतीय ठार

datta jadhav
error: Content is protected !!