Tarun Bharat

रशियात साडीमध्ये हिंडतेय तापसी

मॉस्कोनंतर सेंट पीटर्सबर्गची सैर

तापसी पन्नूने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विदेशी भूमीत तिचा देशी अवतार पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मॉस्कोनंतर तिने सेंट पीटर्सबर्गमध्ये एखाद्या पाश्चिमात्य पोशाखाऐवजी साडीची निवड केली आहे. शहरातील रस्त्यांवर साडी आणि स्नीकर्समध्ये तापसीला पाहून चाहते तिची प्रशंसा करत आहेत.

तापसीने स्वतःचा हा देशी अवतार इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तापसी छायाचित्रात पिवळय़ा रंगाच्या साडीमध्ये दिसून येते. याचबरोबर तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर सेंट पीटर्सबर्गमधील स्वतःच्या प्रवासाची अनेक छायाचित्रेही शेअर केली आहेत. यापूर्वी तिने मॉस्कोची सैर केली होती. तेथेही तिने निळय़ा रंगातील साडी परिधान करून चाहत्यांची मने जिंकली होती.

तापसीने रशियात अभिनेत्री श्रिया सरन आणि तिचा पती आंद्रेई कोशी यांचीही भेट घेतली आहे. तापसी यापूर्वी ‘थप्पड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तर ‘हसीन दिलरुबा’ हा तिचा चित्रपट 2 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. विनिल मॅथ्यू यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट मर्डर मिस्ट्री आहे. चित्रपटात तापसीसह विक्रांत मैसी आणि हर्षवर्धन राणे आहे. याचबरोबर तापसीचे ‘लूप लपेटा, ‘रश्मि रॉकेट’, ‘दोबारा’ आणि ‘शाबास मिठू’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम करत आहे.

Related Stories

श्रीलंकन नागरिकाची पाकिस्तानी जमावाकडून हत्या

Patil_p

इम्रान खान यांची अखेर मुक्तता

Amit Kulkarni

इस्रायलला मान्यता देणार नाही : पाकिस्तान

Patil_p

‘ब्रेक्झिट’वर अखेर समझोता

Omkar B

दहशतवाद पोसणाऱयांवर कारवाई व्हावी

Patil_p

ट्रम्प यांच्यावरील वादग्रस्त पुस्तकाच्या विक्रीला न्यायालयाची परवानगी

datta jadhav
error: Content is protected !!