Tarun Bharat

रशियात 8 लाख रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियात आतापर्यंत 9 लाख 85 हजार 346 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 8 लाख 04 हजार 383 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

रशियात शुक्रवारी 4 हजार 829 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 110 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रशियात 1 लाख 63 हजार 938 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2 हजार 300 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 17 हजार 025 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत रशियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. रशियात आतापर्यंत 3 कोटी 60 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 60 लाख 97 हजार 318 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 38 लाख 12 हजार 605 तर भारतात ही संख्या 34 लाख 68 हजार 272 एवढी आहे.

Related Stories

इंडोनेशियाच्या कॅफेतील अनोखी कॉफी

Patil_p

Ratnagiri Breaking : मंडणगडात 4 लाखाच्या पाचशे, हजारच्या जुन्या नोटा जप्त

Abhijeet Khandekar

“कितीही आरोप केले तरी सरकराच्या प्रतिमेला तडे जाणार नाहीत”

Archana Banage

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा ‘लॉकडाऊन नाही’चा पुनरुच्चार

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये 200 दहशतवादी सक्रिय

datta jadhav

विधानसभा अध्यक्षांनी तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये; महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचे आदेश

Abhijeet Khandekar