Tarun Bharat

रशियाने तयार केले कोरोनावर प्रभावी औषध

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियाने कोरोनावर प्रभावी औषध तयार केले आहे. या औषधाने कोरोना रुग्ण 4 दिवसात बरे झाल्याचा निष्कर्ष या औषधाच्या चाचणीतून काढण्यात आला आहे. रशियाच्या आरोग्य यंत्रणेने हे औषध वापरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे 11 जूनपासून या औषधाचा वापर कोरोना रुग्णांवर करण्यात येणार आहे. रशियाच्या आरडीआयएफ प्रमुखांनी एका वृत्तसंस्थेला यांसर्भात माहिती दिली आहे.

रशियाने तयार केलेल्या या औषधाची नोंदणी ‘एविफेविर’ नावाने करण्यात आली आहे. हे औषध बनवणारी कंपनी महिन्याला ६० हजार रुग्णांवर उपचार करता येतील, एवढे औषध तयार करणार आहे. ११ जूनपासून रशियन रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर या अँटीव्हायरल औषधाने उपचार सुरु होणार आहेत. ‘एविफेविर’ हे औषध फॅव्हीपीरावीर म्हणून ओळखले जाते. १९९० साली जपानी कंपनीने या औषधाची निर्मिती केली होती. ताप, सर्दीसाठी जपानमध्ये या औषधाचा वापर केला जातो. 

फॅव्हीपीरावीर या जपानी औषधात काही बदल करून 
रशियाने एविफेविर हे औषध तयार केले आहे. रशियात 330 रुग्णांवर या औषधांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामधील बहुतांश केसमध्ये कोरोना रुग्ण चार दिवसात बरे झाले आहेत. अमेरिकेतील गिलीयड सायन्सेस या कंपनीने बनवलेले ‘रेमडेसिविर’ हे अँटीव्हायरल औषधही कोरोनावर  प्रभावी ठरत आहे.

Related Stories

दया नायक यांच्या गोंदियातील बदलीला मॅटकडून स्थगिती

Archana Banage

हरयाणात 30 जून पर्यंत च्युईंगम विक्रीवर बंदी 

prashant_c

कोल्हापुरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ; महिला डॉक्टरसह 8 जण पॉझिटिव्ह

Archana Banage

गुगल भारताला करणार 135 कोटींची मदत

datta jadhav

‘सात’ दहशतवाद्यांना कंठस्नान..!

Rohit Salunke

राम मंदिरासाठी 40 किलो चांदीची शिळा; मोदींच्या हस्ते होणार अर्पण

datta jadhav
error: Content is protected !!