Tarun Bharat

रशियाला 1 लाख सैनिक पुरविणार उत्तर कोरिया

Advertisements

पुतीन यांना मदत करणार किम जोंग उन

वृत्तसंस्था / प्योंगयांग

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला 160 हून अधिक दिवस झाले आहेत. युद्ध संपण्याऐवजी त्याची तीव्रता वाढत चालली आहे. या युद्धात रशियाने मोठय़ा संख्येत स्वतःच्या सैनिकांना गमावले आहे. अशा स्थितीत रशियाने आता उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांच्याकडून सैनिकांची मागणी केली आहे. रशियाने 1 लाख सैनिकांच्या बदल्यात उत्तर कोरियाला कच्चे तेल तसेच गहू पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. तर उत्तर कोरियाने सैनिक पुरविण्याची तयारी दर्शविली आहे.

युद्धात नुकसानग्रस्त झालेल्या यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी सैनिक उपलब्ध करणार असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. याचबरोबर रशियाकरता सैनिकांची एक मोठी तुकडी पुरविण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. या सैनिकांना  लुहान्स्क आणि डोनेट्स्कमध्ये रशियाचे समर्थनप्राप्त फुटिरवाद्यांच्या सैन्यामध्ये तैनात केले जाणार आहे. दोन्ही प्रांतांना किम जोंग उन यांनी अलिकडेच स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे.

डोनबासमध्ये सुमारे 1 लाख सैनिक पाठविण्यास उत्तर कोरिया तयार आहे.  सैनिक पुरविण्याच्या बदल्यात किम जोंग यांच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला कच्चे तेल तसेच धान्याचा पुरवठा रशियाकडून करण्यात येणार आहे. किम जोंग उन यांच्याकडून पुढे करण्यात आलेला मदतीचा हात स्वीकारण्यास रशियाने टाळाटाळ करू नये असे सैन्याधिकारी इगोर कोरोटचेंको यांनी म्हटले आहे.

Related Stories

जगातील सर्वात अवघड प्रवेश परीक्षा ‘सुनेयुंग’

Patil_p

एसिम्पटोमॅटिक : संसर्गाची शक्यता कमी

Patil_p

19 वर्षीय युवती जगाच्या भ्रमंतीवर

Amit Kulkarni

54 देश…10.5 लाख रुग्ण

Patil_p

कोरोनाकाळात ‘संजीवनी’ ठरली प्रोन पोजिशन

Patil_p

पाकिस्तानात कोरोना रुग्णांची संख्या 2,81,863 वर

Rohan_P
error: Content is protected !!