Tarun Bharat

”रशियासंदर्भातील भारताच्या भूमिकेवर बायडेन नाराज”

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत

गेले 27 दिवस सुरु असलेलं युक्रेन – रशिया युद्ध काही केल्या थांबायला तयार नाही. दिवसें – दिवस विध्वंसक क्षेपणास्त्रांचा वापर करत युक्रेनला गुडघे टेकायला भाग पाडणे हा रशियाचा मनसुभा असुन, युक्रेन ही आपल्या निर्णयावर ठाम आहे. या साऱ्यामुळे मात्र दोन्ही राष्ट्रांसह जगाची सामाजिक, अर्थिक, नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

या बाबत बायडेन यांनी भारत हा अमेरिकेसोबत चांगले संबंध असणाऱ्या मात्र अमेरिकी धोरणांना आधारुन निर्णय न घेणाऱ्या अपवादात्मक मित्रराष्ट्रांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. भारताने आता रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतल्याने बायडेन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियावर निर्बंध लागू करुन पाश्चिमात्य देशांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र यासंदर्भात भारत काही प्रमाणात अस्थिर दिसून येतोय, असं बायडेन यांनी म्हटलंय.

अमेरिकेमधील उद्योजकांच्या बैठकीला संबोधित करताना बायडेन यांनी हे वक्तव्य केलं. भारताची रशियासंदर्भातील भूमिका ही थोडी डळमळीत झाल्यासारखी दिसतेय असं सांगतानाच बायडेन यांनी नाटो यापूर्वी कधीच एवढं शक्तीशाली आणि एकी दाखवणारं नव्हतं जेवढं आज आहे, असंही म्हटलंय.

Related Stories

महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या मोदींविरोधात मिरजेत काँग्रेसची तीव्र निदर्शने

Sumit Tambekar

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे राजीनाम्याचे संकेत

Abhijeet Shinde

कोल्हापुरात शिवसेना आक्रमक; खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा

Abhijeet Khandekar

भरधाव कार झाडावर आदळुन पाचजण जागीच ठार

Sumit Tambekar

‘केजरीवाल सरकार पाच वर्षात २० लाख नोकऱ्या देणार’

Abhijeet Shinde

राष्ट्रपती कोविंद पुन्हा UP दौऱ्यावर; अयोध्येत रामललाचे घेणार दर्शन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!