Tarun Bharat

रशिया-युक्रेन युद्धात भारताची मध्यस्थी?

रशियाचे परराष्ट्रमंत्री दोन दिवसीय भारत दौऱयावर : कच्चे तेल आणि रुपया-रुबल पेमेंट सिस्टमसंबंधीही चर्चा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

युपेन युद्धादरम्यान भारतात आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भारत हा महत्त्वाचा देश आहे. रशिया-युपेन वादात तो मध्यस्थी करू शकतो. यासोबतच आमचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिल्याचे बैठकीनंतर लावरोव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव शुक्रवारी दोन दिवसांच्या भारत दौऱयावर दाखल झाले. या दौऱयात त्यांच्या विविध पातळीवर चर्चा व बैठका सुरू झाल्या असून भारताला कच्च्या तेलाचा माफक किमतीत पुरवठा करण्यासह रुपया-रुबल पेमेंट सिस्टीमसंबंधीही

युपेनच्या मुद्यावर लावरोव्ह यांनी भारताचे कौतुक केले आणि भारत कोणत्याही दबावाशिवाय समजूतदारपणे पुढे जात असल्याचे सांगितले. कोणत्याही दबावाशिवाय आपल्या राष्ट्रीय हितांवर लक्ष केंद्रित करणे हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे वैशिष्टय़ आहे. रशियन फेडरेशनचेही समान धोरण असून भारत हा विश्वासू मित्र आणि भागीदार असल्याचेही त्यांनी नमूद केले. रशिया आणि युपेनमधील वादात भारत मध्यस्थ होऊ शकतो का? यावर बोलताना भारत हा रशियासाठी महत्त्वाचा देश आहे. जर भारत मध्यस्थाची भूमिका निभावू शकत असेल आणि आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी वाजवी सूचना देत असेल तर आम्ही भारताची ही भूमिका स्वीकारू, असे लावरोव यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 24 फेब्रुवारी, 2 मार्च आणि 7 मार्च रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. तसेच युपेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्वोदिमिर झेलेन्स्की यांच्याशीही दोनदा चर्चा केली आहे.

भारताला कोणत्याही आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची रशियाची तयारी आहे. भारत आणि रशिया दीर्घकाळापासून संरक्षण भागिदारी विकसित करत आहेत. आम्हा दोघांना जागतिक व्यवस्थेत संतुलन राखायचे आहे, असेही रशियाचे परराष्ट्रमंत्री पुढे म्हणाले. परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेदरम्यान दोन प्रमुख मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यानुसार रशियाकडून किफायतशीर दरात कच्च्या तेलाची खरेदी आणि द्विपक्षीय व्यापारासाठी रुपया-रुबल पेमेंट सिस्टम यावर बोलणी पूर्ण झाल्याचे  रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी सांगितले.  तसेच भारत रशियन लष्करी उपकरणांसह ए-400 क्षेपणास्त्र प्रणालीचे काही भाग वेळेवर पोहोचवण्यासाठीही सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. रशिया-युपेन युद्धादरम्यान रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दोन दिवसांच्या चीन दौऱयानंतर रशियाचे परराष्ट्रमंत्री भारतात पोहोचले आहेत.

रशियासंबंधी भारत तटस्थ भूमिकेवर ठाम

युपेनमधील युद्धविराम थांबवण्यासाठी भारताने जागतिक मंचांवर पुनरुच्चार केला आहे, परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत रशियाच्या विरोधात मतदान करणे टाळले आहे. या हल्ल्याबाबत भारताने रशियावर टीकाही केलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही रशियाविरोधात कारवाई करण्याबाबत भारताची भूमिका स्पष्ट नसल्याचे म्हटले आहे.

सवलतीत क्रूड विकण्याची ऑफर

पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांचा सामना करणाऱया रशियाला भारताला कच्च्या तेलाची स्वस्तात विक्री करायची आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय किमतीवरून प्रति बॅरल 35 डॉलरच्या सवलतीने क्रूड विकण्याची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुद्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली.

Related Stories

भाजप उमेदवार एसपी बघेल यांना झेड श्रेणीची सुरक्षा

Patil_p

जगातील 10 मूल्यवान एक्स्चेंजमध्ये बीएसई सामील

Patil_p

हंगेरियन ट्रेकरला लष्कराकडून जीवदान

Patil_p

‘आयएनएस विशाखापट्टणम’ नौदलाच्या ताफ्यात

Patil_p

पहिल्यांदाच परराज्यातील व्यक्तीला मिळाले जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व

datta jadhav

महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी कमलनाथ नियुक्त

Patil_p