Tarun Bharat

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मोदींचा युरोप दौरा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

 युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियाच्या विरोधात बहुतांश युरोपीय देश एकजूट झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपच्या दौऱयावर आहेत. चालू वर्षातील मोदींचा हा पहिला विदेश दौरा आहे. युक्रेन-रशिया युद्धाप्रकरणी भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे. युरोपीय क्षेत्राला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असताना मोदींचा हा दौरा होतोय. जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सचा पंतप्रधान मोदी दौरा करणार आहेत.

भारत युरोपीय भागीदारांसोबत सहकार्याची भावना मजबूत करू इच्छितो असे मोदींनी म्हटले आहे. विदेश धोरणाच्या दृष्टीकोनातून मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. 2 मे पासून या तिन्ही देशांच्या तीन दिवसीय दौऱयावर ते असणार आहेत. यादरम्यान ते या देशांमध्ये सुमारे 65 तास घालविणार असून 25 हून अधिक कार्यक्रमांमध्ये सामील होतील.

जर्मन चॅन्सेलर ओलाफ शॉल्ज यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान मोदी हे 2 मे रोजी बर्लिनच्या दौऱयावर असतील. तर त्यानंतर 3-4 मे रोजी डेन्मार्कच्या पंतप्रधान प्रेडरिक्सन यांच्या निमंत्रणावर द्विपक्षीय चर्चेत सामील होण्यासाठी ते कोपनहेगनचा दौरा करतील तसेच द्वितीय भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत ते भाग घेणार आहेत. स्वतःच्या दौऱयाच्या अंतिम टप्प्यात ते काही काळासाठी फ्रान्समध्ये थांबणार असून यादरम्यान प्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करणार आहेत.

दौऱयाच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी बर्लिनमध्ये जर्मन चॅन्सेलर ओलाफ शॉल्ज यांच्यासोबत चर्चा करतील. या बैठकीत दोन्ही देशांचे अनेक मंत्री सामील होतील. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सत्तेवर आलेल्या शॉल्ज यांच्यासोबत मोदींची ही पहिली बैठक असणार आहे. या दौऱयादरम्यान पंतप्रधान मोदी आणि चॅन्सेलर शॉल्ज व्यापारी संमेलनाला संयुक्तपणे संबोधित करतील. जर्मनीतील भारतीय समुदायासोबत मोदी संवाद साधणार आहेत. दौऱयाच्या दुसऱया टप्प्यात डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे प्रेडरिक्सन यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान मोदी कोपनहेगन येथे जाणार आहेत. तेथे भारत-नॉर्डिक संमेलनात ते सहभागी होतील. डेन्मार्कमध्ये मोदींची प्रेडरिक्सन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. याचबरोबर डेन्मार्कमधील उद्योगजगताच्या प्रतिनिधींसोबत ते बैठकीत सामील होतील.

Related Stories

निवडणूक काळात हजार कोटींचा मुद्देमाल जप्त

Patil_p

शेत जमिनींचे तंटे मिटणार ! नववर्षात ‘सलोखा योजना’ येणार

Kalyani Amanagi

आरपीडी कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Amit Kulkarni

भीक मागणे सामाजिक अन् आर्थिक समस्या

Patil_p

कोरोना मार्गदर्शक नियम धाब्यावर

Omkar B

मुतगा आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

Omkar B