Tarun Bharat

रस्ते किती दिवसांत दुरुस्त करणार?

कॅन्टोन्मेंट बैठक : एल ऍण्ड टी कंपनीला विचारणा करण्याची सूचना

प्रतिनिधी /बेळगाव

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्यास कोणताच आक्षेप नाही. पण जलवाहिनी घालतेवेळी खोदण्यात आलेले रस्ते वर्षभर तसेच राहण्याची शक्मयता आहे. त्यामुळे जलवाहिन्या घातल्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण किती दिवसांत करणार, असा मुद्दा कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रशासक ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध जलकुंभांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या घालण्यात येणार आहेत. सदर जलवाहिन्या रामघाट रोड, थिम्मय्या रोड, स्वतंत्रता मार्ग अशा विविध रस्त्यांशेजारी घालण्यात येणार आहेत. याकरिता रस्त्यांची खोदाई करावी लागणार आहे. यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे परवानगी घेण्यासाठी पत्र पाठविण्यात आले होते. या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे योजनेंतर्गत करण्यात येणाऱया कामाला आक्षेप घेता येणार नाही. पण जलवाहिन्या घालण्यासाठी रस्ता खोदून तसाच ठेवण्याची शक्मयता आहे. रामघाट रोड, स्वतंत्रता मार्ग आणि थिम्मय्या रोड हे तिन्ही रस्ते महत्त्वाचे आहेत. सदर रस्त्यांवर खोदाई करून ठेवण्यात आल्यास वाहनधारकांसह लष्कराच्या वाहनांनाही अडथळा होण्याची शक्मयता आहे. जलवाहिन्या घालण्यासाठी कोणतीच हरकत नाही. पण जलवाहिन्या घातल्यानंतर रस्त्याचे पुनर्डांबरीकरण किती दिवसांत करणार याची माहिती एल ऍण्ड टी कंपनीने दिली नाही. त्यामुळे एल ऍण्ड टी कंपनीच्या प्रतिनिधींना याबाबत विचारणा करण्याची सूचना ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी केली. अधिकाऱयांशी चर्चा करून माहिती मिळाल्यानंतर परवानगी देण्यात यावी, अशी सूचना केली.

31 डिसेंबरपर्यंत लीजची मुदत वाढणार

काही जागांच्या लीजची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे लीजवाढीसाठीचे अर्ज कॅन्टोन्मेंट बोर्डकडे करण्यात आले होते. सध्या जागा लीजच्या धोरणात बदल करण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी जानेवारीनंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत लीजची मुदत वाढविण्यास कोणतीच हरकत नसल्याचे सांगण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात एकाच हुद्यावर वर्षानुवर्षे काम करणाऱया कामगारांना वाढीव वेतन देण्याची सूचना राज्य शासनाने केली आहे. त्यामुळे त्या कामगारांना वाढीव वेतन देण्यास मंजुरी देण्यात
आली.

शहरात अवजड वाहतुकीस रस्ता बंद ठेवण्यात आल्यानंतर सर्व वाहने स्वतंत्रता मार्गाने वळविली जातात. त्यामुळे स्वतंत्रता मार्ग, मिलिटरी महादेव मंदिर शेजारील रस्ता व थिम्मय्या रोडपासून अरगन तलावपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात यावा, असा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडे सादर करण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा यांनी बैठकीत दिली. पण स्मार्ट सिटीकडे निधी नसल्याचे सांगण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करा

स्मार्ट सिटीची कामे सुरू असताना वाहने कॅन्टोन्मेंटमधील रस्त्याने वळविण्यात आली होती. कोरोनाकाळातही वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यापूर्वी तीन रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्याचा प्रस्ताव होता. पण एकाही रस्त्याचा विकास करण्यात आला नाही. त्यामुळे याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रस्त्यांच्या विकासाबाबत जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करण्याची सूचना ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी केली. बैठकीला कॅन्टोन्मेंटचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुरली ची बेळगावात चौकशी

Tousif Mujawar

कडोलीत 85 टक्के मतदान

Patil_p

सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी हतबल

Amit Kulkarni

रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी 8 लाख

Omkar B

साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणार

Patil_p

खेळासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक

Amit Kulkarni