Tarun Bharat

रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी 8 लाख

आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची माहिती : खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक रस्त्यांची दर्दशा

प्रतिनिधी / खानापूर

खानापूर तालुक्यात यावषीसुद्धा अतिवृष्टी झाली होती. कधीकधी दिवसाला 400 ते 500 मि. मी. इतका पाऊस झाला होता. साहजिकच जास्त पावसामुळे येथील रस्ते व पुलांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आमदार अंजली निंबाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, ग्रामीण विकास खाते तसेच लघुपाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांना रस्ते दुरुस्तीसाठी आराखडा तयार करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तिन्ही खात्याच्या अधिकाऱयांनी रस्ते दुरुस्तीसाठी 27 कोटी रुपयाचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठविला होता. त्यानंतर आमदार अंजली निंबाळकर यांनी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्याबरोबरच मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील तसेच जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांच्या परिस्थितींची त्यांना छायाचित्रासह माहिती देऊन अनुदान मंजूर करण्याची मागणी केली होती.

  आमदार अंजली निंबाळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे खानापूर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी 5 कोटी 8 लाख रुपये इतके अनुदान मंजूर केले आहे. त्यामधून आता खानापूर-तालगुप्पा रस्त्यापैके खानापूर-बिडी रस्ता दुरुस्तीसाठी 40 लाख रुपये, गुंजी-किरावळे रस्त्यापैकी किरावळय़ाजवळ अर्धा फुटून वाहून मोठा खड्डा पडला होता. तिथे रिटेनिंग वॉल संरक्षक भिंतीसाठी 23 लाख, नागरगाळी-नंदगड रस्त्यावर नागरगाळी येथे पुरामुळे पूल खराब झाला आहे त्या पुलाच्या दुरुस्तीसाठी 40 लाख, बंकी-बसरीकट्टी-हडलगा रस्त्यावरील लहान पूल दुरुस्तीसाठी 18 लाख, इटगी-हिरेमुन्नवळी रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीसाठी 12 लाख, तिवोली-नेरसा रस्त्यावरील पूल दुरुस्तीसाठी 20 लाख रुपये, देवाचीहट्टी ते बैलूर रस्ता खूपच खराब झाला आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी 1 कोटी 95 लाख रुपये, कक्केरी-बैलूर व्हाया सुरपूर-केरवाड हा रस्ता बराच खराब झाला आहे त्यासाठी 1 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

 तसेच तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पाहता मंजूर झालेला निधी कमी असल्याने यापुढेदेखील सातत्याने पाठपुरावा करून उर्वरित निधीदेखील मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार अंजली निंबाळकर यांनी दिली आहे. 

Related Stories

शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱयांना अटक करा

Patil_p

जुगारी अड्डय़ावरील छाप्यात 12 हजार रुपये जप्त

Patil_p

एक खड्डा चुकविण्याच्या नादात दुसऱया खड्डय़ात लोटांगण

Amit Kulkarni

धर्मवीर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करणाऱयांना नोटिसा

Patil_p

रोटरी क्लबतर्फे हब्बनहट्टी येथे आरोग्य तपासणी शिबिर

Amit Kulkarni

शहराच्या उत्तर भागातील पाणी पुरवठा दोन दिवस बंद

Patil_p