Tarun Bharat

रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अपघात झाल्यास मिळणार भरपाई

Advertisements

बेंगळूर महापालिकेचा निर्णय : वाहनधारकांना दिलासा

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेंगळूरमध्ये रस्त्यांवरील खड्डे ही अनेक दशकांपासूनची मोठी समस्या आहे. या खड्डय़ांमुळे अनेक जणांचे प्राण गेले आहे. दरम्यान, बेंगळूर महानगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे वाहन अपघात झाल्यास भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. तर अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. महापालिकेनेच यासंबंधी माहिती दिली आहे.

बेंगळूरमध्ये निकृष्ट रस्ते व खड्डय़ांमुळे अपघात झाल्यास वाहनमालकाने अर्ज केल्यास भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी दिली. यापूर्वी खड्डय़ांमुळे अपघात झालेल्यांना भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला होता. त्यामुळे भरपाईसाठी मार्गसूची तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच भरपाईसाठी अर्ज करणाऱयांची कागदपत्रे पडताळण्यासाठी महापालिकेने महसूल विभागाच्या विशेष आयुक्तांची नेमणूक केली आहे. किरकोळ जखमींना 5 हजार रुपये, तीन दिवसांपेक्षा अधिक कालावधीच्या उपचारासाठी 10 हजार रु. गंभीर जखमींना 15 हजार रु. देण्याची घोषणा केली आहे.

Related Stories

बेंगळूर ‘लॉकडाऊन’बाबत आज निर्णय

Amit Kulkarni

तीन वर्षात 12.36 लाख बोगस बीपीएल कार्डे रद्द

Amit Kulkarni

द. आफ्रिका, ब्राझीलमधून येणाऱया प्रवाशांना कोविड चाचणीची सक्ती

Amit Kulkarni

१० नौदल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

कोविड रुग्णांवर ‘या’ थेरपीद्वारे होणार उपचार

Abhijeet Shinde

कॉंग्रेस नेते प्रियांक खरगे यांची केंद्र सरकारवर टीका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!