Tarun Bharat

रस्त्यावरील धोकादायक विद्युत खांबांचे स्थलांतर करण्याची मागणी

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील प्रमुख रस्त्यांवर डेकोरेटिव्ह पथदीप तसेच फुटपाथवर दिवे लावण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र उपनगरातील रस्त्यावर असलेले विद्युत खांब हटविण्याकडे महापालिका प्रशासनाचा कानाडोळा झाला आहे. वडगाव बाळगृष्णनगर परिसरात रस्त्यावर असलेले विद्युत खांब वाहनधारकांना धोकादायक ठरत असल्याने स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

स्मार्ट सिटी योजनेंर्गत विविध विकासकामे राबविण्यासाठी कोटय़वधी निधी खर्च करण्यात येत आहे. या अंतर्गत भूमिगत विद्युतवाहिन्या घालून डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले आहेत. काही ठिकाणी सुस्थितीत असलेले पथदीप आणि पथदीप खांब बदलण्यासाठी निधी खर्ची घालण्यात आला आहे. मात्र ज्या ठिकाणी खरोखरच पथदीप बसविण्याची व विद्युतखांब स्थलांतर करण्याची गरज आहे अशा ठिकाणी कामे करण्यास निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नागरिकांना अडचण आहे अशा ठिकाणी असलेले विद्युत खांब बदलण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बाळकृष्णनगर, वडगाव परिसरातील काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. पण येथील रस्त्याचा वाद असल्याने अतिक्रमण न हटवताच रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांबदेखील हटविण्यात आले नाहीत. रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना मध्यभागी असलेले विद्युत खांब स्थलांतर करणे गरजेचे होते. पण याकडे मनपा अधिकाऱयांनी व कंत्राटदाराने दुर्लक्ष करून रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत महापालिकेकडे अनेकवेळा निवेदन देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

Related Stories

खैरवाड संपर्क रस्त्यावर दलदल

Amit Kulkarni

न्यायाधीशांना धमकी देणे, दबाव घालणे थांबवा

Amit Kulkarni

संभाजी रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

रेल्वेत महिलांची बॅग चोरणाऱ्या तरुणाला अटक

Tousif Mujawar

कोनवाळ गल्ली नाला बांधकामाचा शुभारंभ

tarunbharat

बेल्लदबागेवाडी येथील तरुणी बेपत्ता

Amit Kulkarni
error: Content is protected !!