Tarun Bharat

रस्त्यावर चलनी नोटा टाकण्याचे प्रकार सुरूच

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

रस्त्यावर चलनी नोटा सापडण्याचे प्रकार सुरूच आहेत. मात्र या नोटा कोण टाकत आहेत? त्यांचा उद्देश काय आहे? याबाबत तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. शनिवारी सकाळी आपटेकर गल्ली महाद्वार रोड मुख्य रस्त्याशेजारी 200 रुपयाची नोट आढळून आली आहे. सदर नोट एका युवकाने घेतली होती. यावेळी वन टच फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील तेथून जात असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी आपल्याजवळील सॅनिटायझर घेऊन त्या युवकावर आणि नोटेवर शिंपडले. तसेच ही नोट न घेण्याबाबत त्या युवकास सांगितले.

शनिवारी गजाननराव भातकांडे शाळेसमोर भाजीपाला विक्री सुरू होती. यावेळी मोठय़ा प्रमाणात खरेदीसाठी नागरिक ये-जा करीत होते. याचवेळी रस्त्याशेजारी 200 रुपयाची चलनी नोट आढळून आली. एका युवकाने ही नोट उचलली. मात्र कोरोनामुळे असे प्रकार जाणुनबुजून करण्यात येत असून नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच असे प्रकार करणाऱयांचा शोध घेणेही गरजेचे बनले आहे.

Related Stories

बळ्ळारी नाला परिसराला पुराचा विळखा

Amit Kulkarni

बसस्थानक आवारातील रस्त्यांची दुर्दशा

Amit Kulkarni

ग्रामपंचायतींवर झेंडा नेमका कुणाचा?

Amit Kulkarni

घरपट्टीवर नोव्हेंबरपासून 2 टक्के दंडव्याजाचा भूर्दंड

Patil_p

मच्छे-पिरनवाडीतील कचरा समस्या सुटणार कधी?

Amit Kulkarni

खेळाडू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन-प्रशिक्षण दिल्यास यश निश्चित

Amit Kulkarni
error: Content is protected !!