जर तुम्ही रस्त्यावर ड्राइव्ह करत असल्यास अनेकदा बेकर येतात. काही बेकर छोटे तर काही उंच असतात, परंतु कधीकधी रस्त्यावर अनेक ब्रेकर एकामागोमाग येत असतात, तेव्हा वाहनाचा वेग कमी करावा लागतो. वाहनातून प्रवास करत असलेलया लोकांना बेकर पार करताना टायरचा आवाज ऐकू येतो. त्याच आवाजाला एक धुन देण्यात आल्यास संगीतसारखे ऐकू येऊ शकते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक वाहन स्पीडबेकरवरून जात असताना आकर्षक धुन ऐकू येत असल्याचे दिसून येते.
स्पीड बेकरद्वारे वाजणार धुन
रस्त्याच्या कडेला स्पीड बेकरसारख्या छोटय़ा-छोटय़ा पट्टय़ा धुन तयार करू शकतील अशाप्रकारे बसविण्यात आल्या आहेत. गाडीचा टायर या पट्टय़ांवर चढताच आवाज ऐकू येतो, परंतु एका धुनमध्ये. कारमध्ये बसलेले लोक सहजपणे हा आवाज टिपू शकतात. कारमध्ये संगीताची धुन ऐकली जाऊ शकते. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


एक म्युझिक नोटची ध्वनी निर्माण होईल अशाप्रकारे सर्व पट्टय़ा सेट करण्यात आल्या आहेत. प्रत्येक म्युझिक नोटसाठी स्ट्रिप्सची संख्या भिन्न असते. हे बार बाहेरील बाजूस लावलेले असतात किंवा त्यात तयार केलेले असतात. त्यांना स्लीपर लाइन्स, ऑडिबल लाइन्स किंवा वू वू बोर्ड्स म्हणून ओळखले जाते. संगीत रोड्सची ही कल्पना प्रारंभी अमेरिकेत लोकप्रिय झाली होती. होंडा कंपनीने या बेकरला लँकेस्टर सिटीच्या बाहेरील भागात ठेवले होते.