Tarun Bharat

रस्त्यावर पडलेली माती काढण्यावरून दोन कुटुंबात हाणामारी

हुबळी/प्रतिनिधी

रस्त्यावर पडलेली माती काढण्यावरून दोन कुटुंबात झालेला वाद विकोपाला जाऊन परस्परांना जबर मारहाण झाल्याची घटना, गब्बूरु बायपास जवळ घडली आहे.

रस्त्यावर पडलेली माती काढण्यावरून आधी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्या दोघांची माणसे एका ठिकाणी येऊन मारामारी झाली. एका कुटुंबातील रियान अहमद गुडमाले तसेच दुसऱया कुटुंबातील असिफ अली दोडवाड हे दोघे जखमी झाले आहेत. विद्यानगर येथील किम्स रूग्णालयात प्राथमिक रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. कसबापेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. हुबळी – धारवाडचे कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रामराजन यांनी किम्स रूग्णालयाला भेट देऊन, घटनेची चौकशी केली.

Related Stories

मित्राच्या खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप

Archana Banage

आणखी 9 मेडिकल कॉलेज राज्यात सुरू करणार : सुधाकर

Amit Kulkarni

मेट्रो रेल्वेसाठी 14,778 कोटींची तरतूद

Patil_p

बेंगळूर : राष्ट्रपती एरो इंडिया-२०२१ च्या सांगता समारंभास उपस्थित राहणार

Archana Banage

कर्नाटक हायकोर्टाकडून मुख्यमंत्र्यांना दिलासा

Archana Banage

युकेहून कर्नाटकात आलेल्या १७५ जणांशी संपर्क नाही

Archana Banage