Tarun Bharat

रस्त्यावर ३२ वर्षीय पुरुषाचे गुप्तांग कापले

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी व कडबगाव रस्त्यावर ३२ वर्षीय पुरुषाचे धारदार रेजर ब्लेडने संपूर्ण गुप्तांग कापल्याने गंभीर जखमी असून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. महिबूब सैपन कलबुर्गी (वय ३२ रा. तडवळगा ता. इंडी जि. विजापूर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना दि. १८ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १७ रोजी सायंकाळी ७ वाजता विजापूरहुन मुन्ना चांदसाब पटेल, अब्दुल हमीदनजीर मुल्ला हे दोघे मिळून मोटारसायकलीने फिर्यादी महिबूब सैपन कलबुर्गीच्या घराजवळ गेले व फिर्यादीस जेवण्यासाठी धाब्यावर चल म्हणून मणुर गावाजवळ आणले. त्या ठिकाणी हुसेन नबीलाल तोडंगी (रा. करजगी ता. अक्कलकोट) हा तिसरा मित्र मणुर येथे आला. हे तिघे मिळून फिर्यादीस (कडबगाव ता. अक्कलकोट) जवळ मित्राची गाडी खराब झाली आहे, असे सांगून आणले. फिर्यादी महिबूब सैपन कलबुर्गी यास अज्ञात कारणाने वरील तिघांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने मारहाण करत जमिनीवर पाडले. ठार मारण्याचा उद्देशाने डोक्यात बियरच्या बाटलीने मारले व त्यानंतर खिशातून ब्लेड काढून महिबूबचे ब्लेडच्या सहाय्याने संपूर्ण गुप्तांग कापून काढले. त्यानंतर संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. गुप्तांग कापल्याने महिबूब बेशुद्ध पडला दि. १८ रोजी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर दुसऱ्याच्या मोबाईलवरून आपल्या भावाला कळवले. त्यानंतर नातेवाईक व पोलीस घटनास्थळी पोहचले. जखमी महिबूब सैपन कलबुर्गी यांच्यावर सोलापूर येथे उपचार चालू असून प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित तिन्ही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात चालू होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छबु बेरड हे करीत आहेत.

Related Stories

बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोहर भोसलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Abhijeet Shinde

सोलापूर : वैरागमध्ये सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Abhijeet Shinde

Solapur; अक्कलकोट तालुक्यात या हंगामातील सर्वाधिक पाऊस; बोरगाव गावात पावसाचे रौद्ररूप

Abhijeet Khandekar

उस्मानाबाद : विना परवानगी कोविड रुग्णांवर उपचार केल्यास कारवाई

Abhijeet Shinde

घराबाहेर पडू नका, वीजा चमकताना झाडाखाली उभे राहू नका

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव खरेदी केंद्र मंजूर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!