Tarun Bharat

रहदारी पोलिसांची भाजी विक्रेत्यांवर कारवाई

शहरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे मोहीम

प्रतिनिधी बेळगाव

शहरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे रहदारी पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासून रस्त्याशेजारी भाजी विक्री करणाऱया विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. अखेर युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या भाजी विक्रेत्यांवर आमदार अनिल बेनके यांच्याशी संपर्क साधून नियमावलीनुसार भाजी विक्री करू, असे सांगितल्याने ही कारवाई थांबविण्यात आली.

शुक्रवारी सकाळपासून केळकरबाग, समादेवी गल्ली तसेच इतर भागातील भाजी विक्रेत्यांवर रहदारी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. आधीच लॉकडाऊनपासून व्यापार नसल्याने छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यातच रहदारी पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे यात भर पडली आहे. शहरात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या होत असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई सुरू केली होती.

आमदारांकडून पोलिसांना सूचना

या भाजी विक्रेत्यांवर युवा कार्यकर्ता शंकर पाटील यांच्याशी संपर्क साधला. शंकर यांनी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्याशी फोनवरून संपर्क साधून झालेली घटना सांगितली. रस्त्याशेजारी असणाऱया पांढऱया पट्टय़ाच्या आतच बसून विक्री करू, असे विक्रेत्यांनी आमदारांना सांगितले. त्यानंतर आमदारांनी पोलिसांना सूचना केल्यानंतर ही कारवाई थंडावली.

Related Stories

शहापूरमधील ग्रामदेवतांना घालण्यात आले गाऱहाणे

Patil_p

माजी नगरसेवक संघटना जिल्हा पालकमंत्र्याची भेट घेणार

Patil_p

रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करा

Omkar B

पावसामुळे भाजीपाला दरात वाढ

Patil_p

युवकांनी देशसेवेला वाहून घ्यावे

Amit Kulkarni

बनावट सोने देऊन रक्कम उचलणाऱया युवकाला अटक

Patil_p