Tarun Bharat

रहिवासी दाखले वेळेवर मिळत नसल्याने सत्तरीच्या विद्यार्थी, नागरिकांना जबरदस्त फटका.

आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी गांभीर्याने लक्ष द्यावे

प्रतिनिधी /वाळपई

 सरकारी कामासाठी अत्यावश्यक असणारा रहिवासी दाखला प्राप्त करण्यासाठी सत्तरी तालुक्मयातील नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .गेल्या एक महिन्यापासून रहिवासी दाखले उपलब्ध होत असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाले असून याची सरकारने यंत्रणेने गांभीर्याने दखल घ्यावी अशा प्रकारची मागणी सत्तरी तालुक्मयातील नागरिकांनी केली आहे. वेळेवर रहिवासी दाखला उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे अशा प्रकारच्या तक्रारी हाती आलेल्या आहेत.

याबाबतची माहिती अशी की सरकारने नागरिकांना चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून ऑनलाईन पद्धतीने रहिवासी दाखले उपलब्ध करण्याची प्रक्रिया एक वर्षांपूर्वी सुरू केली. यामुळे संबंधित मामलेदार कार्यालयात किंवा पंचायत कार्यालयात हेलपाटे घालण्याऐवजी आपली कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरून ती संबंधित अधिकाऱयांना सादर केल्यानंतर रहिवासी दाखले त्वरित उपलब्ध करण्याची ही सुविधा आहे. आता सत्तरी तालुक्मयात मात्र या सुविधेचा व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आलेले आहे. गेल्या तीन वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने रहिवासी दाखले उपलब्ध करण्याची प्रक्रिया रखडली जात असून यामुळे तमाम नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे .

याबाबत नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पंचायत किंवा सरकारमान्य सुविधा केंद्रातून ऑनलाइन पद्धतीने रहिवासी दाखले प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आलेले आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये रहिवासी दाखला उपलब्ध होणे गरजेचे आहे .मात्र सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार कार्यालयांमध्ये ही प्रक्रिया रखडली जात असून यामुळे वेळेवर रहिवासी दाखले उपलब्ध होत नसल्याचे अनेकांनी स्पष्ट केले आहे. यामुळे अनेकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान याबाबत अनेकांनी सदर सुविधा केंद्राची संपर्क साधून रहिवासी दाखला संदर्भात विचारणा केली असता सदर केंद्रातून सर्व कागदपत्रे मामलेदार कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात आलेली आहेत .मात्र तिथून अजून पर्यंत रहिवासी दाखला उपलब्ध झालेला नाही अशी माहिती देण्यात येत असते असे यावेळी नागरिकांनी सांगितले .

दरम्यान या संदर्भात होंडा या ठिकाणी कार्यरत असलेले सुविधा केंद्राचे मालक कल्पेश गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की होंडा भागातील अनेकांचे रहिवासी दाखला यांची कागदपत्रे सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार कार्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात आलेले आहेत. मात्र सदर कागदपत्र अजून पर्यंत मंजुरी न मिळाल्यामुळे अनेकांचे रहिवासी दाखले प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले .गेल्या दोन महिन्यापासून ही प्रक्रिया पूर्णपणे रखडलेली आहे. यामुळे रहिवाशांना जबरदस्त फटका बसू लागलेला आहे. खास करून विद्यार्थ्यांना याची मोठय़ा प्रमाणात झळ बसली असून सरकारने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केलेली सुविधा नागरिकांसाठी अडचणी निर्माण होत असेल तर सरकारने ही पद्धत त्वरित बंद करावी किंवा रद्द करावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थीवर्ग नागरिकांनी केलेली आहे. दरम्यान काही नागरिकांनी या संदर्भातील तक्रार स्थानिक आमदार व माजी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे करण्याचे ठरविले आहे. सरकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुविधा असताना तमाम नागरिकांची अशाप्रकारे अडचण निर्माण करणे म्हणजे सरकारच्या एकूण प्रशासकीय कारभाराची कंटाळवाणे उदाहरण असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत.

Related Stories

आयुर्वेदाला भोंदू म्हणणे देशदोही कृत्य – श्रीपाद नाईक

Patil_p

कृषीहिताचे कायदे मागे घेणे अशक्य

Patil_p

टॉय बीच क्लब हॉटेल पाडण्याचा आदेश

Amit Kulkarni

दुचाक्या चोरणारा जेरबंदः 6.5 लाखांच्या दुचाक्या जप्त

Amit Kulkarni

युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा

Amit Kulkarni

गॅस वाहिनीच्या कामाच्या सुरक्षेबाबत आमदार संकल्प आमोणकर यांनी व्यक्त केला संशय

Amit Kulkarni