Tarun Bharat

रांगेत थांबून टोल भरावा लागत असल्याने वाहनधारक संतप्त

Advertisements

तासवडे टोलनाक्यांवर वाहतुक कोंडी

प्रतिनिधी/ उंब्रज

कोरोनाची भीडभाड सोडून महामार्गावर वाहणांची वर्दळ आहे. त्यातच दिवाळी सुट्टय़ा संपल्याने मुंबई पुण्याकडे जाणारा चाकरमानी परतु लागल्याने रस्तांवर वाहतूक मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्याचा परिणाम तासवडे टोलनाक्यांवर दिवाळीच्या कालावधीत दिसून आला गुरुवारी दुपारी तासवडे टोलनाक्यावर कराड ते सातारा लेनवर लांबपर्यंत वाहणांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारक अक्षरशः वैतागले. रांगेत थांबून टोल भरायचा कशाला अशा संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांच्यात असुन टोलनाक्यावरील नियोजनाच्या फज्जा उडल्याचे चित्र आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी तासवडे टोलनाक्यावर वाहतुकीच्या लांबलाब रांगा दिसून येत होत्या. वाहणांची संख्या वाढल्याने कराड ते सातारा लेनवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण निर्माण झाला. त्यामुळे वाहनधारकांना अस्ते कदम रांगेत थांबून टोल भरावा लागला. ऐव्हढा वेळ रांगेत थांबून टोल भरायचा कशाला अशी कुरुबूर वाहणधारकांच्यात होती. टोलनाका व्यवस्थापणाने सणासुदीच्या काळात तसेच सुट्टय़ांच्या दिवशी होणारी गर्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी लवचिकता आणने गरजेचे आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात ही समस्या सुटली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.    

       कालपासून दिवाळी सुट्टय़ा संपल्याने चाकरमानी शहरांकडे परतू लागला आहे. तसेच लाँकडाऊनमुळे गेल्या आठ महिन्यांत घराबाहेर पडता न आलेली मंडळी कोरोना आजाराचा वाढता संसर्ग कमी झाल्याने तसेच  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर   नातेवाईकांच्या भेटीगाठीसाठी  घराबाहेर पडली होती ती आता परतू लागली आहे. त्याचात परिणाम महामार्गावरील गर्दीवर झाला आहे.  तासवडे  येथील टोलनाक्यावर गुरुवारी कराड बाजूकडून सातारा बाजूकडे जाणाया वाहनांची वर्दळ वाढली होती. परिणामी टोलनाक्यावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. अनेक वाहणधारकांना बराच वेळ रांगेत रखडावे लागले त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. 

   आठ महिन्यांपूर्वी कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कडक लाँकडाऊन जाहिर करण्यात आला होता, परिणामी नाईलाजाने सर्वांना घरात थांबावे लागले होते, लाँकडाऊनमुळे देवदर्शनासह अनेकांची इतर कामेही रखडली होती. दरम्यान राज्य शासनाने आता हळूहळू लाँकडाऊन शिथील केल्यामुळे लाँकडाऊनमुळे गेल्या आठ महिन्यांत घराबाहेर पडता न आलेली मंडळी कोरोना आजाराचा वाढता संसर्ग कमी झाला असल्याने तसेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर व नातेवाईकांच्या भेटीगाठीसाठी  घराबाहेर पडताना दिसत आहेत. महामार्गावरील तासवडे येथील टोलनाक्यावर याचा परिणाम जाणवून येत असून दिवाळीच्या प्रारंभी सातारा बाजूकडून कोल्हापूर बाजूकडे जाणाया लेनवर वाहनांची वर्दळ वाढल्याचे चित्र होते तर कालपासून कोल्हापूर ते सातारा लेनवर वर्दळ वाढली आहे. या लेनवर गुरुवारी वाहणांच्या रांगा लागल्या. सोमवार पासून राज्यातील बंद असलेली मंदिरेही खुली झाल्याने  महामार्गावर आणखी वर्दळ वाढली आहे. त्यामुळे टोल नाक्यावरुन वाहनधारकांना सहज व जलदरित्या प्रवास करता यावा यासाठी टोल व्यवस्थापनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.  

Related Stories

अल्पवयीन तरूणीच्या विनयभंग प्रकरणी कोल्हापूरच्या पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

Archana Banage

मतभेद दूर करण्यासाठी चीन अमेरिकेसोबत काम करण्यास तयार

Abhijeet Khandekar

राजाचे कुर्ले येथे आढळला कोरोना रुग्ण

Archana Banage

Sanjay Raut : संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; कोर्टाचा आदेश

Abhijeet Khandekar

महाबळेश्वर : राष्ट्रीय लोक अदालतीत २०९ प्रकरणे निकाली

datta jadhav

Rajya Sabha Election LIVE : सर्वपक्षीय २८५ आमदारांचं मतदान पूर्ण, मात्र मतमोजणी सुरू होण्यास विलंब लागणार

Archana Banage
error: Content is protected !!