अजित औरवाडकर यांनी रेखाटलीय रांगोळी : ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीला 725 वर्षे झाल्याचे औचित्य
प्रतिनिधी / बेळगाव
ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीला यंदा 725 वर्षे होत आहेत. यानिमित्त आळंदी येथे सप्ताह सोहळा साजरा केला जात आहे. याचेच औचित्य साधून रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी ज्ञानेश्वर माऊलींची दोन फुट बाय तीन फुट आकाराची रांगोळी रेखाटली आहे.


या रांगोळीसाठी त्यांना दहा तासांचा कालावधी लागला. ही रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ वडगाव येथे दि. 7 तारखेपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 8.30 पर्यंत पाहण्यास खुली आहे.