Tarun Bharat

राऊत यांच्या वक्तव्याचा मराठा मोर्चाकडून निषेध

आमच्या पद्धतीने उत्तर देऊ : मराठा क्रांती ठोक मोर्चा

 पुणे / प्रतिनिधी :

उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, या संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असून, त्यांच्या या वक्तव्याचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने संजय राऊत यांना आवर घालण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अन्यथा शिवप्रेमी त्यांच्या पद्धतीप्रमाणे राऊत यांना आवरतील, असा इशारा ठोक मोर्चाच्या वतीने संजय सावंत यांनी दिला.

शिवसेनेने शिवसेना नाव ठेवताना महाराजांच्या वंशजांना विचारले होते का ? या उदयनराजे यांच्या वक्तव्याबाबत राऊत यांना विचारले असता, उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर मराठा मोर्चाने नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱया ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या लेखकाचा देखील निषेध केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी राऊतांना आवरावे

संजय सावंत म्हणाले, संजय राऊत यांनी जे विधान केले, त्याचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱया गोयल यांचा देखील निषेध करतो. राऊत आणि गोयल हे प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये करत आहेत. राजकारणात काय बोलायचे ते बोला. परंतु आमच्या अस्मितेविषयी बोलत असाल तर आम्ही घरात घुसून मारु. मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना आवरावे, नाहीतर शिवप्रेमी त्यांच्याप्रमाणे आवरतील. संजय राऊतांच्या लिखाणावर तसेच बोलण्यावर बंदी घालावी. नाहीतर राऊत यांना ठोक भाषेतून आम्ही उत्तर देऊ, असे सावंत यांनी सांगितले.

Related Stories

पुणे : मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची पहिली पेटी दाखल

prashant_c

ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

सोलापूर : हगलूर येथे महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Archana Banage

सोलापूर शहरात कोरोनाने एकाचा मृत्यू, 30 नवे रुग्ण

Archana Banage

महत्वाची बातमी! यंदा दहावी,बारावी निकाल २० जूनच्या आधी

Rahul Gadkar

डॉ. बी. वाय. यांना विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Archana Banage