Tarun Bharat

राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने वाढ

वार्ताहर / तुडये

मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी दिवसभर दमदार हजेरी लावल्याने बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2454.30 फूट  होती. त्यामध्ये सायंकाळी अर्ध्या फुटाने वाढ होत पाणीपातळी 2454.80 फूट  झाली आहे.

मागील वषी पाणीपातळीने निच्चांकी पातळी गाठली होती. डेडस्टॉकमधील पाणी पाच विद्युत मोटारींद्वारे उपसा करत शहराला पाणीपुरवठा करावा लागला होता. यावेळी मात्र कोरोना महामारीच्या अनुषंगाने बेळगाव शहरातील संपूर्ण व्यवहार दोन महिने बंद झाल्याने हॉटेल व अन्य व्यवसायांकडून पाणी वापर कमी झाला. मात्र, जलाशय स्थापनेपासून प्रथमच 7 ते 8 बॅकप्रेशरने (बीपी) पाणीपुरवठा करण्यात आला. यापूर्वी हा पाणीपुरवठा 3 ते 4 बॅकप्रेशरने करण्यात येत होता.

मागील वषी 3 जून रोजी जलाशयाची पाणीपातळी 2448.50 फूट होती. गतवषीच्या मानाने यंदा 6.3 फूट पाणीसाठा जादा आहे. मागीलवषी जून महिन्यात पाणीपातळी डेड स्टोरेजमधील होती.

Related Stories

खानापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करावा

Patil_p

निपाणीजवळ 35 लाखांचा बेकायदा दारू साठा जप्त

Patil_p

बेळगावात पहाटे पहाटे लस दाखल

Tousif Mujawar

मतदारयादी मराठीमध्ये उपलब्ध

Omkar B

स्पोर्टिंग फुटबॉल चषक स्पर्धेत एमएसडीएफ विजेता

Amit Kulkarni

अखेर बायपासवरील यंत्रसामग्री हलविली

Amit Kulkarni