बेधडक विधान करण्यात राखी सावंतचा हात कोणीच धरू शकत नाही हे प्रत्येकालाच माहित आहे. सध्या राखीची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती तिने केलेल्या हटके मागणीमुळे. इन्स्टापेजवर व्हिडिओद्वारे राखीने चाहत्यांकडे चक्क किडनी द्या अशी विनवणी केली आहे. तिचे चाहते, राखीन आपल्याकडून काहीतरी मागितले याच्या आनंदात तर आहेतच, पण राखीला किडनी का हवी, या विचाराने त्यांचे डोके भंडावून गेले आहे. याचे कारणही तिने सांगितले आहे. तिला मेडिकल इमर्जन्सीसाठी किडनी नकोय तर आयफोन विकत घ्यायचा आहे त्यासाठी पैसे जमा करण्यासाठी तिला किडनीची गरज आहे, हे कारण ऐकून मात्र चाहत्यांनी डोक्याला हात लावला आहे. आयफोनसाठी राखी चाहत्यांकडून मिळणारी किडनी विकण्याच्या तयारीत आहे असा तिच्या पोस्टचा अर्थ होत आहे. नेटकऱयांना कळून चुकलेय की राखीच्या वायफळ बडबडींसारखी ही पण एक बडबड आहे. पण या पोस्टमुळे राखीने तिच्या लाखो चाहत्यांचे मनोरंजन केले हे मात्र खरे.


previous post
next post