Tarun Bharat

राजकारणाच्या डावात मायकल लोबो अखेर सफल

हॅटट्रीक करीत कळंगुटमध्ये नवीन विक्रम,बार्देशात  काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आणले,पती-पत्नी निवडून येण्याचाही केला बार्देशात विक्रम

गिरीश मांद्रेकर /म्हापसा

 कळंगुटचे माजी मंत्री तथा आमदार मायकल लोबो यांनी 9285 मते मिळवून  मतदारसंघात सलग तीनवेळा निवडून येत हॅटट्रीक साधत एक नवा  विक्रम केला आहे. गेल्या 50 वर्षात या मतदारसंघात सलग तीनवेळा निवडून येण्याचा मान कुणीही मिळविला नाही. काही टॅक्सी चालक, शॅक मालक, आदींनी लोबो विरोधात मतदान करण्याचा आवाज केला होता. विरोधकांनीही लोबो इतर  धंद्यात गुंतल्याचा आरोप करीत अफवाही पसरल्या होत्या. मात्र त्याचा काहीच फरक लोबोवर पडला नाही.

आचारसंहिता लागल्यावर लोबोनी भाजपला रामराम ठोकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा फायदाच त्यांना झाल्याचे आज म्हणावे लागेल. हा डाव त्यांच्यावरच उलटेल असे  म्हटले जात होते.  मात्र राजकारणाच्या या चालीत लोबो आपल्या डावात सफल झाले. तसेच  बार्देशात काँगेसचे चार उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश आले.

कळंगूट मतदारसंघाचा मागील 50 वर्षांचा आढावा घेता या मतदारसंघात दोन  पेक्षा अधिक वेळा अद्याप कुणीही आमदार झाला नाही.   मायकल लोबो यांनी यंदा हॅटट्रीक साधतात की आऊट होतात याकडे  सर्वांचे लक्ष लागून होते. मायकल लोबो (काँग्रेस), जोसेफ सिक्वेरा (भाजप), सुदेश मयेकर (आप), अँथनी मिनेझीस (तृणमूल) असे प्रमुख उमेदवार रिंगणात होते. लोबो व सिक्वेरा पुन्हा एकदा आमने सामने होते. फरक एवढाच दोघांची चिन्हे यावेळी उलट होती. हिंदू मतदार व सर्वसामान्य जनता लोबोबरोबर होती. या मतदारसंघात ख्रिश्चन बांधवांची मते कोणाच्या बाजूनी कौल देतात आणि विशेषतः कांदोळी येथे असलेली बंजारा समाजाची सुमारे 5 हजार मते कुणाच्या बाजूनी वळतात याकडे सर्वांचे लक्ष होते.

लोबोनी दहा वर्षे या मतदारसंघात कार्य केले आहे. त्यांची मतदारांशी अपुलकी आहे. त्यांनी स्वतःची एक वेगळी फळी निर्माण केली आहे. भाजपची जी मते होती ती लोबोंच्या की सिक्वेरा यांच्याबाजूने कौल देतात यावर   नशीब ठरणार होते. दोघेही  राजकारणी असून भाजपने आपल्या चालीत जोसेफना   तिकीट दिल्याने लोब्नोची थोडीफार राजकीय समीकरणे बदलली होती. मात्र ते कोणती वेगळी चाल खेळतात यावर त्यांचे नशीब अवलंबून होते. लोबोंचा पराभव करणे हे भाजपचे मिशन असून त्यासाठी पक्ष कोणत्याही थराला जाण्यास तयार होता. शिवोलीतून दयानंद मांद्रेकर, साळगावातून जयेश साळगावकर, दिलीप परुळेकर, म्हापशातून जोशुआ डिसोझा, हळदोणेतून ग्लेन टिकलो, पर्वरीतून रोहन खंवटे या नेत्यांनी लोबोंचा पराभव करण्यासाठी अस्त्र हाती घेतले होते. मात्र त्याचा  उपयोग झाला नाही.

 मायकल लोबो भाजपामधून 2017 साली निवडून आल्यानंतर   वर्षभरात त्यांनी सरकारविरोधात थेट आरोप करण्यास सुरुवात केली. यामुळे सरकार पातळीवर ते जड झाले होते.  पक्षश्रेष्ठीनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकले नाहीत. यादरम्यान स्व. पर्रीकरांच्या निधनानंतर त्यांना कचरा व्यवस्थापन मंत्रीपद देण्यात आले.   त्यांनी निवडणुकीला अवघे सहा महिने असताना शिवोली मतदारसंघातून आपली पत्नी डिलायला लोबो निवडणूक रिंगणात उतरणार असे जाहीर केले. त्यामुळे शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर संतप्त झाले. येथूनच राजकारणाला सुरुंग लागला आणि लोबोनी पक्षाविरोधात खुलेआम बोलणे सुरू केले. असे असले तरी लोबोना मंत्री मंडळातून काढून टाकण्याचे धाडस मात्र कुणलाही झाले नाही. शेवटी आचरसंहिता लागल्यावर लोबो पती पत्नीनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी जिल्हा पंचायत सदस्य अँथनी मिनेझीस व जोसेफ सिक्वेरा लोबोचा पाडाव करण्यासाठी एकत्र आले. लोबोना काँग्रेस प्रवेश दिल्यावर ते नाराज झाले आणि आपली वेगळी चूल करण्यासाठी तृणमूलमध्ये दाखल झाले.

आप पक्षातर्फे कळंगुटमध्ये पंच सदस्य सुदेश मयेकर रिंगणात होते. मयेकर हे एकेकाळचे लोबो यांचे खंदे समर्थक होते. दोघेही एकामेकांविरोधात रिंगणात होते. राजकारणाची चाल कशी खेळावी हे मयेकर, लोबोकडूनच शिकले होते, मात्र तीच चाल त्यांच्यावर उलटली.

तृणमूलतर्फे अँथनी मिनेझीस रिंगणात होते. ते माजी जिल्हा पंचायत सदस्य होते. त्यांचा वावरही या मतदारसंघात होता. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस त्यांच्याबरोबर होते. मात्र ते काही मत परिवर्तन करू शकले नाहीत आणि येथे लोबोच विजयी झाले.

कळंगूट मतदारसंघः

 • मायकल लोबो (भाजपा)- 9285
 • जोसेफ सिक्वेरा (काँगेसö 4306
 • मार्सेलिन गोन्साल्वीस (आरजी) – 2538
 • अँथनी मिनेझीस (तृणमूल) – 1690
 • सुदेश मयेकर (आप) – 1769
 • रोशन माथायस (गोस्वापा) – 561

आजपर्यंत विजयी झालेले उमेदवार

 • 1972 – जगदीश राव – युएसजी – 6032 मते
 • 1977 – राहुल फर्नांडिस – एमएजी – 4021 मते
 • 1980 – विफ्रेड डिसोझा – काँग्रसे – 8920 मते
 • 1984 – श्रीकांत मळीक – एमएजी – 5995 मते
 • 1989 – सुरेश परुळेकर – काँग्रसे – 7182 मते
 • 1994 – तोमाझीन कार्दोज – काँग्रेस – 7716
 • 1999- सुरेश परुळेकर – युजीडीपी – 7670 मते
 • 2002 – आग्नेल फनर्आंडिस – काँगर्से – 9711 मते
 • 2007 – आग्नेल फर्नांडिस – काँगर्से – 8319 मते
 • 2012 – मायकल लोबो – भाजपा – 9891 मते
 • 2017 – मायकल लोबो – भाजपा – 11136 मते
 • 2022 – मायकल लोबो – कॉग्रेस – 9285 मते

हॅटट्रीककडे सर्वांचे लक्ष

गेल्या 50 वर्षांची आकडेवारी पाहत कळंगूट मतदारसंघात आजवर आग्नेल फर्नांडिस (काँग्रसे) व मायकल लोबो (भाजपा) व सुरेश परुळेकर (काँग्रेस व युजीडीपी) या तिघांनी प्रत्येकी दोनवेळा निवडून येण्याचा पराक्रम केला आहे. मायकल लोबो 2012 व 2017 च्या निवडणुकीत सलग दोनवेळा निवडून आले असले तरी यंदा ते हटट्रीक करून कळंगुटमध्ये नवा इतिहास घडवितात काय याकडे सर्वांचे डोळे लागून होते. लोबोचा पराभव करण्यासाठी भाजपाने आपली वेगळी चाल खेळून सर्वशक्ती पणाला लावली होती. वरिष्ठ नेतेही कळंगुटमध्ये ठाण मांडून बसले होते. मात्र लोबोंच्या प्रेमापोटी शक्य झाले नाही.

Related Stories

लोकांना आर्थिक मदतीची गरज नव्हे मोदीच्या पत्राची

Omkar B

ग्राम पंचायत निवडणुकीत काँग्रेस ताकदीनिशी उतरणार

Amit Kulkarni

नियोजित आयआयटीला विरोध करणाऱया 9 शेतकऱयांना समन्स

Amit Kulkarni

भंडारी समाजातील उमेदवारांना संधी देणाऱया पक्षांना पाठिंबा

Amit Kulkarni

मडगावात गुरुवारपासून सरस महोत्सव

Amit Kulkarni

कला मंदिरच्या घुमट आरती स्पर्धेत म्हापसाचे साई बोडगेश्वर मंडळ प्रथम

Amit Kulkarni