Tarun Bharat

राजकारण बदलण्याच्या ध्येयपूर्तीसाठी कार्यरत व्हा

दिल्लीचे समाजकल्याणमंत्री राजेंद्र पाल गौतम यांचे आवाहन : प्रा. राजेश कळंगुटकर, अनिल गावकर ’आप’मध्ये

प्रतिनिधी /पणजी

राजकारण बदलण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी गोमंतकीयांनी आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन दिल्लीचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी केले आहे. रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत मये आणि सावर्डे मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. त्यात प्रामुख्याने मये भू विमोचन नागरी कृती समितीचे सचिव प्रा. राजेश कळंगुटकर आणि भाजपचे ज्येष्ट नेते आणि गोमंतक गौड मराठा समाजाचे सचिव अनिल गावकर यांचा समावेश होता.

पुढे बोलताना गौतम यांनी, ’आम आदमी पक्षाने लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला असल्याचे सांगितले. आप हा पहिला पक्ष आणि केजरीवाल हे पहिले नेते आहेत, ज्यांनी देशाचे राजकारण बदलण्याचे ध्येय ठेवले आणि त्या दिशेने काम केले आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी ’आप’ला संधी द्यावी, असे ते पुढे म्हणाले.

दिल्लीतील शैक्षणिक कार्याने प्रभावित : कळंगुटकर

कळंगुटकर हे पणजीतील डॉन बॉस्को येथे व्यवसाय व्यवस्थापनाचे व्याख्याते आहेत. ते या क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत आहेत आणि शिक्षण विभागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी संसाधन व्यक्ती म्हणून काम करतात. गोवा मराठी अकादमीशी संलग्न ग्राम समिती आणि मराठी सांस्कृतिक केंद्र, मयेचे अध्यक्ष देखील आहेत. आपण स्वतः गेली 20 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने दिल्ली सरकारने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामामुळे प्रभावित झालो, असे राजेश कळंगुटकर म्हणाले.

राज्यात सध्या फक्त एकच व्यक्ती आयएएस अधिकारी बनली आहे. याचा अर्थ गोमंतकीयांमध्ये या पदापर्यंत पोहोचण्याची क्षमता नाही असा होत नाही. संसाधनांच्या अभावामुळे आपल्याला या क्षेत्रात गोव्याचे लोक दिसत नाहीत. केजरीवाल यांनी सहाव्या इयत्तेपासून अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार केला आहे जेणेकरून तरुणांना विशेष प्रशिक्षणाची गरज भासणार नाही. इथे आमच्याकडे कौशल्यावर आधारित शिक्षण नाही. दिल्लीत शैक्षणिक मॉडेलमध्ये कौशल्यांना महत्त्व दिले जाते, असे ते पुढे म्हणाले.

सावर्डे मतदारसंघात आपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केजरीवाल हे शब्द पाळणारे आहेत. त्यांनी दिल्लीत निवडणुकीपूर्वी दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले. त्यांच्या दूरदृष्टीने दिल्लीत बदल घडवून आणता आला तर गोव्यासारख्या छोटय़ा राज्यातही ते शक्मय आहे. मी लोकांना विनंती करतो की, राज्यात प्रामाणिक काम करणाऱया ’आप’ला मतदान करा, असे प्रतिपादन अनिल गावकर यांनी केले.

मंत्री पाऊसकरांचे स्वीय सचिव ’आप’ मध्ये अनिल गावकर हे माजी आमदार तथा विद्यमान खासदार विनय तेंडुलकर यांचे स्वीय सचिव होते, सावर्डे मतदारसंघात तेंडुलकरांच्या विजयासाठी त्यांनी 1999 ते 2007 पर्यंत काम केले आहे. त्यानंतर माजी आमदार गणेश गावकर यांचेही  स्वीय सचिव म्हणून काम केले 2012 ते 2017 पर्यंत त्यांच्या विजयासाठी काम केले. नुकतेच त्यांनी आमदार दीपक पाऊसकर यांचे स्वीय सचिव म्हणून काम केले.

Related Stories

‘मतदार राजा’ आज बजावणार हक्क

Patil_p

सांगे, केपेतील शेतकरी मोठय़ा प्रमाणात झेंडू लागवडीत

Amit Kulkarni

जनाधार कुणाला? आज फैसला

Patil_p

भाजपचे प्रवक्ता दत्तप्रसाद नाईक यांना पितृशोक

Omkar B

जुवारी ऍग्रो जमिनीचा महाघोटाळा

Amit Kulkarni

कोरोंटाईनसाठी खलाशांकडून पैसे आकारणार नाही

Omkar B
error: Content is protected !!