Tarun Bharat

राजकीय, सामाजिक मेळावे, यात्रांवर बंदी

प्रतिनिधी/ सातारा

जानेवारी महिन्यात मंदावलेली कोरोना बाधितांची वाढ फेब्रुवारी महिन्यात वाढू लागली असून राज्यासह जिल्हय़ात देखील रुग्ण वाढीचे प्रमाण वाढल्याने जिल्हय़ात प्रशासन अर्लट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर सोमवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यामध्ये एक आठवडाभरासाठी रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली असून यापुढे राजकीय, सामाजिक मेळावे, यात्रा, जत्रांसह गर्दीच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी देखील त्यांचे नियोजित कार्यक्रम, बैठका दि. 1 मार्चपर्यंत रद्द केले असून नागरिकांनी नियम पाळावे, असे आवाहन केले आहे.

जिह्यात 71 टक्के लसीकरण झाले आहे. परंतु यामध्ये खासगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी लस घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही सुरक्षीत असून खासगी डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱयांनी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

ङराजकीय, सामाजिक मेळावे,यात्रा, जत्रा याच्यावर बंदीङ

जिह्यात कोरोना संसर्ग वाढू नये याकरिता कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक मेळाव्यांना, यात्रा व जत्राना ( कमीत कमी लोकात धार्मिक विधी करता येईल) याच्यावर निर्बंध असतील. आठवडाभरानंतर परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येतील असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

गृहराज्यमंत्री देसाई यांचे नियोजित कार्यक्रम रद्द

राज्यात गेल्या काही दिवसात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता दुस्रया लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दि. 22 फेब्रुवारी पासून राज्यात सामाजिक ,धार्मिक कार्यक्रम, मिरवणूक, मोर्चे, यात्रांवर शासनाने बंदी घातली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे दि.01 मार्च, 2021 पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम, बैठका रद्द केल्या आहेत.  गृहविभागाच्या अत्यंत तातडीच्या व महत्त्वाच्या बैठका गरजेनुसार  गृहविभागामार्फत देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करुन घेणार असल्याची माहिती  गृहराज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी दिली.

 राज्यात कोरोनाच्या दुस्रया लाटेचा धोका असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री   उध्दव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक,धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ‘होय मीच जबाबदार’ ही मोहिम राबवून मास्क घालणे,सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरने हातू धुणे हे त्रिसुत्री कार्यक्रम राबवून यातून लॉकडाऊन टाळण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्याचे पालन राज्यातील जनतेने काटेकोरपणे करावे व शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोना टाळावा असे आवाहनही  गृहराज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी केले.

                                                                     महाविद्यालय व शाळांची अचानक होणार तपासणी

महाविद्यालय, शाळा सुरु झाल्या आहेत. महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शाळांचे संस्थाचालक शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करतात की नाही याची पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संयुक्त पणे अचाकन महाविद्यालय व शाळांना भेटी देवून तपासणी करावी कोणी अंमलबजावणी करत नसल्यास कारवाई करावी.

टेस्टींग केली नाहीतर होणार गुन्हा

कोरोनाचा संसर्ग जिह्यात काही प्रमाणात वाढत आहे. काही तालुक्यांमध्ये असे निदर्शनास आले आहे की, एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला तर त्याच्या संपर्कात आलेले कोरोनाची तपासणी करुन घेत नाहीत, असे आढळल्यास प्रशासनाकडून संबंधितावर गुन्हा दाखल करावा, असे आदेशही पालकमंत्री पाटील यांनी या बैठकीत दिले.

मास्क नसेल तर कारवाई होणारच

मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन करणाऱयांवर पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. आठवडाभरानंतर परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येतील, असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

datta jadhav

‘कोरोना काळात ऑनलाइन शिकवणाऱ्या शिक्षकांचे काम कौतुकास्पद’ – मंत्री गायकवाड

Archana Banage

परप्रांतीयांवर लक्झरी बसचा घाला; एक ठार

datta jadhav

पेट्रोल अखेर शंभरी पार

Patil_p

…म्हणून अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही- दीपाली सय्यद

Archana Banage

मोती चौक परिसरातील पाच व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Archana Banage