Tarun Bharat

राजकीय हस्तक्षेप,दहशतीमुळे महिला डॉक्टरांचा राजिनामा

सीपीआर हॉस्पिटलमधील प्रकार, माजी आमदार, माजी उपमहापौराचाही राजिनामा पत्रात उल्लेख

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील एक माजी आमदार आणि माजी उपमहापौरांसह, कायर्कत्यांच्या दहशत आणि राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून सीपीआर हॉस्पिटलमधील एका महिला डॉक्टराने थेट नोकरीचाच राजिनामा दिला आहे. या डॉक्टरांनी राजिनामापत्रात संबंधित माजी उपमहापौरांच्या नावाचा उल्लेख केला आहे. याची माहिती मिळताच संबंधितांनी सीपीआरमध्ये येऊन यासंदर्भात चौकशी केल्याची चर्चा आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर हॉस्पिटलने कोरोना काळात चांगले काम केले आहे. सीपीआरमधील महिला डॉक्टरांच्या पतीचा आणि एका माजी आमदार, माजी उपमहापौरांत वाद आहे. या वादातून हॉस्पिटलसमोर आंदोलनाचा प्रकारही घडला आहे. या साऱ्या प्रकाराला कंटाळून सीपीआरमधील त्या महिला डॉक्टरांनी सप्टेंबरमध्येच नोकरीचा राजिनामा दिला होता, पण कोरोना असल्याने प्रशासनाने तो स्वीकारलेला नव्हता. महिला डॉक्टरांच्या या राजिनामापत्रात थेट त्या माजी आमदार अन् त्यांचाच कार्यकर्ता असलेल्या माजी उपमहापौराच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपण नोकरीचा राजिनामा देत असल्याचे म्हटले आहे.

माजी आमदार अन् त्या डॉक्टरांतील वादाचा राग सीपीआरवर काढला जात आहे. त्या महिला डॉक्टरांनी अशा त्रासाला कंटाळून राजिनामा दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, संबंधित माजी उपमहापौरांनी बुधवारी सीपीआरमध्ये येऊन मागील काही प्रकरणाची चौकशी केल्याचीही चर्चा सीपीआर वर्तुळात आहे.

Related Stories

व्यावसायिक विषयांच्या परीक्षांचे अर्ज भरण्यास मुदत

Abhijeet Khandekar

घरफाळा आकारणीमध्ये कोटींचा घोटाळा करणाऱ्या दोषींवर गुन्हें दाखल करा

Archana Banage

भुदरगड तालुक्यातील मूळ शिवसैनिक शिवसेनेबरोबर

Kalyani Amanagi

Kolhapur Breaking: कोल्हापुरातील गुळ सौदे पाडले बंद

Archana Banage

काय झाले होते हो, 1857 साली?…

Archana Banage

कोल्हापूर : बसर्गेत पोलिसाची आत्महत्या

Archana Banage