Tarun Bharat

राजधानीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

दोन आरोग्यकर्मींनी जिंकली लढाई

प्रतिनिधी/ सातारा

कोरोना विषाणू साथ सुरु झाली तेव्हा जिल्हय़ात फक्त सातारा शहरानजिक असलेल्या खेडमध्ये एक तर खंडाळा तालुक्यातील एक महिला असे दोन बाधित रुग्ण जिल्हय़ात होते. त्यानंतर मात्र वस्तुस्थिती बदलत गेली अन् कराडमध्ये प्रचंड रुग्णसंख्या वाढू लागली असतानाच सातारा शहरात जिल्हा कारागृहातील बाधितांची संख्या 10 असल्याने आकडा मोठा वाटतोय. मात्र, शहराशी संबंधित पाच बाधित रुग्ण असून त्यापैकी दोन आरोग्यकर्मींनी कोरोनाविरुध्दची लढाई जिंकत त्या कोरोनामुक्त झाल्या असून प्रतापगंज पेठेतील युवक कोरोनामुक्त झाल्याने आता शहराशी निगडीत बाधित पण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोनच उरली असून राजधानी कोरोनामुक्तीकडे वाटचाल करु लागलीय.

सातारा जिल्हय़ात आजमितीस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 129 असली तरी आता कोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने जिल्हय़ाला विशेषतः कराड शहर व तालुक्याला चांगला दिलासा लाभलाय. सातारा शहर व परिसरात बाधित रुग्ण संख्या 19 झाली असली तर शहराशी संबंधित पाच रुग्ण आहेत. पहिला रुग्ण खेड, ता. सातारा गावातील होता. त्याचे निधन झाले आहे. त्यानंतर सातारा शहर व परिसर ग्रीन झोनमध्ये होते. मात्र, एप्रिलच्या अखेरीस व मे महिन्यात बाधितांची संख्या वाढली असली तरी यामध्ये 10 बाधित हे जिल्हा कारागृहातील पुण्याचे कैदी आहेत.

जिल्हा रुग्णालयातील टेक्निशियन अस्टिटंट आरोग्य कर्मचारी बाधित आढळून आल्यानंतर लगेच कराडच्या कॉटेज हॉस्पिटलशी संबंधित नर्स बाधित झाली. यामुळे सदरबझार परिसर, राधिका रस्त्यावरील गार्डन सिटी हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आला. त्यानंतर प्रतापगंज पेठ तर तेथील रुग्णाच्या सहवासात आलेल्या गेंडामाळ परिसरातील महिलेमुळे हे दोन परिसर कंटेन्मेंट झोन झाले. साताऱयातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता आली असून अत्यावश्यक व इतर काही दुकाने झाली आहेत. कोरोनाची दहशत आता कोरोनामुक्त रुग्णांमुळे कमी होणार असली तरी भविष्यात सातारकरांनी अनावश्यक गर्दी टाळून सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुवणे या बाबी कटाक्षाने कराव्याच लागणार आहेत.

ती टेक्निशियन सहाय्यक कोरोनामुक्त

जिल्हा रुग्णालयातच टेक्निशियन सहाय्यक महिला बाधित आढळून आली. ती जिल्हा रुग्णालयात तसेच रुग्णालयानजिक असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये रहात होती. तिच्या हाय व लो रिस्क कॉन्टॅक्टमधील सर्वांची तपासणी झाली. मात्र कोणीही बाधित आढळून आले नाही. आता ती पॉझिटिव्ह असलेली आरोग्यकर्मी तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे कोरोनामुक्त झाली असल्याने त्या परिसरातील निर्बंध उठवण्याबाबत प्रशासनाकडून निर्णय होतील.

कॉटेजमधील नर्सने दिला लढा

साताऱयातील गार्डन सिटीत राहून दररोज कराडच्या ग्रामीण रुग्णालयात काम करत असलेल्या नर्समुळे सर्वांचे धाबे दणाणले होते. ती रहात असलेली गाडर्न सिटी गृहयोजना व परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन होता. तेथील नागरिकांनी देखील नियम पाळत राहणे पसंद केले. तिच्या संपर्कातील अद्याप कोणीही बाधित नसल्याने ती साखळीही तुटणार असून नर्स कोरोनामुक्त झाल्याने गार्डन सिटीने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

प्रतापगंज पेठेच्या आशा पल्लवित

जिल्हय़ात कराड हॉटस्पॉट होत असताना सातारा शहरातील प्रतापगंज पेठेत मुंबईहून आलेल्या कुटुंबांमुळे सातारा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे कुटुंब राजवाडा, मोतीचौक, माहुली परिसरात फिरले होते. त्यामुळे भीती वाढली होती. मात्र, त्या कुटुंबातील बाधित युवकाच्या सहवासात आलेली महिला नातेवाईक व युवकाचा भाऊ बाधित आढळून आल्यानंतर ही साखळी पुढे वाढत नसल्याचे समोर येत आहे. आता प्रतापगंज पेठेतील युवक कोरोनामुक्त झाल्याने उर्वरित रुग्णांच्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले असून पेठेतील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सातारकरांना खबरदारी घ्यावीच लागेल

सातारा शहराची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु असली तरी बाहेरुन येणाऱयांची माहिती नागरिकांनी प्रशासनाला कळवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर  संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी ज्या उपाय योजना प्रशासनाने केलेल्या आहेत. ते नियम काटेकोरपणे पाळून सातारकरांनी खबरदारी घेवून कोरोनाला हरवण्यासाठी व स्वतःबरोबर शहराची काळजी घेण्यासाठी लढा दिलाच पाहिजे. अनावश्यकपणे फिरणे सोडून काही दिवस घरात बसले तर भविष्यकाळ सर्वांसाठी चांगलाच असेल हीच भावना सातारकरांमधून व्यक्त होत आहे.

Related Stories

साताऱयात अथक प्रयत्नानंतर मांजामध्ये अडकलेल्या घारीला जीवनदान

Patil_p

सातारा : क्रांती उदय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ऑक्सिजन मशीनचे लोकार्पण

Archana Banage

पुणे : भारतीय निवडणूक आयोगात संतोष अजमेरा यांची नियुक्ती

Archana Banage

‘रेमडेसिवीर’चा काळा बाजार करणाऱ्या वॉर्ड बॉयला हातकड्या

datta jadhav

मराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको : दलित महासंघाचा पाठिंबा

Archana Banage

सातारा एमआयडीसीतील कचऱयाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा

Patil_p