Tarun Bharat

राजधानीत कार्निव्हलची धूम

Advertisements

‘खा-प्या मजा करा’ किंग मोमो’चा संदेश चित्ररथांबरोबरच नृत्याविष्कार विविध वेशभूषाकारांचा समावेश  पर्यटनमंत्री आजगावकरांच्या हस्ते उद्घाटन कोरोनाच्या सावटामुळे केवळ पणजी, मडगावात आयोजन

प्रतिनिधी / पणजी

गोवा पर्यटन खात्यातर्फे आयोजित केलेल्या कार्निव्हलला शनिवारी पणजीत धुमधडाक्यात सुरुवात झाली. किंग मोमोने सर्वांना ‘खा-प्या मजा करा’ तसेच आनंदी रहा, असा संदेश देत कार्निव्हलला सुरुवात केली आहे. कोविड 19 महामारीच्या संकटावर मात करून राजधानीत कार्निव्हलची धुमधडाक्यात सुरुवात झाली. पेक्षकांचा प्रतिसाद चांगला होता, मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी प्रेक्षक तसे कमीच असल्याचे दिसून येत होते. दरवर्षी राज्याच्या विविध ठिकाणी कार्निव्हलच्या मिरवणुकीचे आयोजन केले जात होते. यंदा कोविडच्या संकटामुळे केवळ पणजी व मडगाव अशा दोनच ठिकाणी कार्निव्हल मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

देशी पर्यटकांनी लुटला आनंद

दयानंद बांदोडकर रस्त्यावर या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या सचिवालयासमोर मिरवणुकीची सुरुवात झाली ती कला अकादमीपर्यंत चित्ररथ मिरवणूक जात होती. चित्ररथांबरोबर नृत्य पथके तसेच विविध पात्रांचे मुखवटे रंगविलेले कलाकारही मिरवणुकीत सहभागी झाले होते. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर, पणजीचे महापौर उदय मडकईकर, पोलीस महानिरीक्षक मुकेश कुमार मिणा व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली. यावर्षी कार्निव्हलसाठी विदेशी पर्यटकांची उपस्थिती खूपच कमी होती, मात्र देशी पर्यटकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लाहून कार्निव्हलचा आनंद लुटला.

पुढील तीन दिवस गोव्यात आमचे राज्य नसून किंग मोमोचे राज्य असणार आहे. ‘खा-प्या व मजा करा’, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले. मिरवणुकीचे उद्घाटन  केल्यानंतर ते बोलत होते. राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यात कार्निव्हलचे आयोजन करणे फार महत्त्वाचे आहे. गोव्यातील कार्निव्हल हा शासकीयस्तरावरील एक उत्सव असल्याचेही मंत्री आजगावकर म्हणाले. कार्निव्हल मिरवणुकीला सुरुवात होताच आजगावकर यांनी व्हिवा कार्निव्हल म्हणत संगीताच्या तालावर उभे असलेल्या ठिकाणीच नाचायला सुरुवात केली.

सुमारे 31 हून अधिक चित्ररथ

दयानंद बांदोडकर रस्त्यावरील जुन्या सचिवालयापासून कला अकादमीपर्यंत  कार्निव्हल मिरवणूक आयोजित केली होती. सुमारे 31 हून अधिक चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. गोव्यातील पारंपरिक व्यवसायांचे तसेच गोव्याची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ होते. निसर्ग वाचवा, जंगली जनावरे वाचवा, पेट्रोल महाग होत असल्याने गोबरगॅसवर वाहने चालवा, असा संदेश देणारे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. सिगारेट ओढल्याने जीवाला धोका दर्शविणारा  चित्ररथही मिरवणुकीत सहभागी होता. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या महासंकटाने थैमान घातले होते. त्याच्यावर उपाय म्हणून सामाजिक अंतर राखा व मास्कचा वापर करा, असा संदेश देणारेही चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाला होता. वेशभूषा स्पर्धेसाठी अनेक कलाकांरानी विविध प्रकारचे जिवंत पुतळे उभे करण्याचा सुंदर प्रयत्न केला होता. त्यात पारंपरिक पाडेली, मासे विकणारी महिला इत्यादींचा समावेश होता. विशेष प्रकारचे वाद्यवृंदही मिरवणुकीत सहभागी झाले होते.

वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा

प्रत्यक्ष चित्ररथ मिरवणुकीला संध्याकाळी 4.30 नंतर सुरुवात झाली असली तरी दुपारपासूनच वाहतुकीत बदल करण्यात आले होते. पणजी शहरात येणाऱया वाहनांना कोकणी अकादमीकडून आत सोडले जात होते. वाहनांची संख्या अधिक व रस्ता अपुरा झाल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. वाहकतूक पोलीस धावपळ करीत होते, मात्र वाहतुकीची कोंडी काही सुटता सुटत नव्हती. वाहनचालक कित्येक तास अडकून पडले होते. काही वर्षापूर्वी कार्निव्हल मिरवणूक मिरामार ते दोनापावला या रस्त्यावर करण्यात आली होती. त्यामुळे कार्निव्हल मिरवणुकी दरम्यान वाहतुकीवर तसा मोठा परिणाम झाला नव्हता. या वर्षी दयानंद बांदोडकर रस्त्यावर मिरवणुकीचे आयोजन केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली व त्याचा त्रास वाहनचालकांना सोसावा लागला. पणजी शहरात येण्या-जाण्यासाठी दयानंद बांदोडकर हा मुख्य रस्ता असून याच रस्त्यावर मिरवणुकीचे आयोजन केल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता.

Related Stories

कोरोना सेवेसाठी कंत्राटीपद्धतीवर 75 कर्मचाऱयांची भरती

Omkar B

इमॅजिन पणजीच्या बैठकीत विविध प्रकल्पांचा आढावा

Patil_p

राजकीय खतखते आता होणार तिखट

Amit Kulkarni

शिक्षक-कर्मचाऱयांनी कामावर हजर राहण्याचे आदेश

Amit Kulkarni

मंत्री लोबोंचा कॉग्रेस प्रवेश तसेच युतीसंदर्भात चर्चा नाही

Amit Kulkarni

कर्लावासियांना स्वयंपूर्णतेसाठी मार्गदर्शन

Amit Kulkarni
error: Content is protected !!