Tarun Bharat

राजधानी एक्सप्रेसमधून 288 प्रवासी गोव्यात

प्रतिनिधी/ मडगाव

राजधानी एक्सप्रेसमधून काल शनिवारी 282 प्रवासी गोव्यात आले. तर तिरूअनंतपुर-दिल्ली या विशेष रेलगाडीतून 36 प्रवासी गोव्यात आले. या सर्वांची फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवरील विलगीकरण केंद्रात रवानगी करण्यात आली असून त्याच ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. जर हे प्रवासी निगेटीव्ह निघाले तर त्यांना आपल्या घरी पाठविले जाईल. नंतर घरातच त्यांना विलगीकरण व्हावे लागेल.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशभरातील विविध रेलमार्गावर विशेष गाडय़ा सुरू केल्या असून त्यात राजधानी एक्सप्रेसचा समावेश होता. काल पहिली गाडी मडगाव रेल्वे स्थानकावर पोचली. त्यातून 288 प्रवासी गोव्यात पोचले. यातील बहुसंख्य प्रवासी हे गोमंतकीय होते. या प्रवाशांना रेल्वे प्रवासाच्या दरम्यान, प्रत्येकी दोन हजार रूपये शुक्ल आकारण्यात येणार असल्याचा संदेश मोबाईलवर पाठविण्यात आल्याने, त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गोमंतकीय प्रवाशांकडून शुल्क आकारले जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली असताना, कोविड-19 चाचणीसाठी शुल्क आकारले जात असल्याने त्यांनी तीव्र ना पसंती व्यक्त केली.

पालक ही पोचले रेल्वे स्थानकावर

दरम्यान, या प्रवाशांमध्ये काही मुलांजवळचे पैसे संपले होते. दोन हजार रूपयांची शुल्क अशी भरावी हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. या मुलांनी आपल्या पालकांकडे संपर्क साधून रेल्वे स्थानकावर पैसे जमा करण्यासाठी बोलावल्याने अनेकांचे पालक रेल्वे स्थानकावर पोचले.

गोमंतकीयांकडून पैसे आकारण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. काल राजधानी एक्सप्रेसमधून आलेल्या काही प्रवाशांनी श्री. कामत यांच्याकडे संपर्क साधून, प्रत्येकी दोन हजार रूपये आकारले जात असल्याची कल्पना त्यांना दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी लक्ष घालून गोमंतकीयांकडून शुल्क आकारू नये शी मागणी विरोधी पक्षनेते श्री. कामत यांनी केली आहे.

 तिरूअनंतपुरमहून आले 36 प्रवासी

तिरूअनंतपुरम-दिल्ली या विशेष रेलगाडीतून 36 प्रवासी गोव्यात आले. त्यांचीही रवानगी विलगीकरण केंद्रात करण्यात आली तर याच रेलगाडीतून 134 प्रवासी दिल्लीकडे रवाना झाले.

आज रविवारी राजधानी एक्सप्रेस पुन्हा दिल्लीकडे प्रयाण करणार आहे. तर अन्य एक रेलगाडी दिल्लीहून गोव्यात येणार आहे.

Related Stories

फोंडय़ात पोलीस अधिकाऱयावर प्राणघातक हल्ला

Patil_p

बोकडबाग डोंगर बळकावू देणार नाही, गावकऱयांचा निर्धार

Omkar B

मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते वळवई येथे हॉटमिक्स कामाचा शुभारंभ

Omkar B

मेळावली आयआयटीचे सीमांकन सुरु

Omkar B

शरद पवार यांची विजय सरदेसाई यांनी घेतली सदिच्छा भेट

Amit Kulkarni

वास्को शहरातील परिस्थिती जैसे थे, दुपारनंतर सामसुम

Amit Kulkarni