Tarun Bharat

राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

देशातील रुग्णसंख्या पाचवर : टांझानियातून भारतात परतल्याची माहिती उपलब्ध

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या रविवारी पाचवर पोहचली. ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात असतानाच रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रानंतर आता राजधानी दिल्लीतही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. संबंधित रुग्ण टांझानियातून भारतात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, बिहारमध्येही विदेशातून परतलेल्या 12 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असले तरी त्यांचा ‘ओमिक्रॉन’ अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना देशासमोर ओमिक्रॉनच्या रुपात नवे संकट उभे राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. देशात ओमिक्रॉनचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आले. त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला. आता राजधानी दिल्लीतही ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. टांझानियातून परतलेल्या व्यक्तीची ओमिक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतोय किंवा नाही, याबाबतचे संशोधन डॉक्टर आणि तज्ञांकडून सुरू आहे. ओमिक्रॉन संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे. याचबरोबर नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरियंटच्या विरोधात भारतीयांमधील ‘हायब्रिड इम्युनिटी’ प्रभावी ठरेल, असा दावा सीएसआयआरकडून करण्यात आला आहे. तरीही सावधगिरीसाठी नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Related Stories

नुपूर शर्मांविरोधात देशभरात निदर्शने

Patil_p

दोन अपघातात बिहारमध्ये 12 ठार

Patil_p

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 104 रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage

म्हणे हा प्रत्यक्ष कोदंडपाणि

Patil_p

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा, परिसर सील करण्याचे कोर्टाचे आदेश

datta jadhav

सोलापुर ग्रामीणमध्ये आज ७ कोरोना पॉझिटीव्ह

Archana Banage