ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी पश्चिम दिल्लीत हा भूकंप झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी कमी होती की, काही लोकांना भूकंपाची जाणीव देखील झाली नाही.
तज्ञांचे मत आहे की, भूकंपासाठी दिल्ली केंद्र संवेदनशील आहे. जर या भागात मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.